Join us  

चला हवा येऊ द्याच्या मंचावर 'या' मायलेकी करणार धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 11:38 AM

"स्वराज्यरक्षक संभाजी" या मालिकेत सोयराबाईराजे साहेबांची भूमिका करणाऱ्या स्नेहलता वसईकर या त्यांच्या मुलीबरोबर लवकरच चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहेत.

"स्वराज्यरक्षक संभाजी" या मालिकेत सोयराबाईराजे साहेबांची भूमिका करणाऱ्या स्नेहलता वसईकर या त्यांच्या मुलीबरोबर लवकरच चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहेत. शौर्याबद्दल त्या सांगतात की "माझ्यातली ती आणि तिच्यातली मी. दिवस रात्र मी फक्त तिच्या विचारात असते". येत्या सोमवार-मंगळवार "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमात ही मायलेकीची जोडी धमाल करताना दिसणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहलता या शौर्याची हुबेहूब नक्कल करतात. या दोघींचे नाते इतके गोड आहे की स्नेहलताने जर एखाद्या गाण्यातून शौर्याला प्रश्न विचारला तर तीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्या आईला उत्तर देते. या दोघींचे आवडीचे गाणे "शौर्या तुला माझ्यावर भरवसा नाय काय?" आणि यावर शौर्याचे उत्तर असते "हाय हाय हाय हाय".   कोणतीही आई ही आपल्या मुलांसाठी कायम त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असते. ही आई थोडी जास्त स्पेशल आहे कारण शूटिंगचे पॅकअप झाल्यानंतर ही आई आपल्या लेकीचं कौतुक करत असते, तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवत असते. स्नेहलता सांगतेय की माझ्या लेकीला कुकीज फार आवडतात. आणि ज्या दिवशी हा कुकीज बनवण्याचा बेत आमच्याकडे असतो तेव्हा शौर्याएवढी खूश असते की माझी कुकीज बनवण्याची गडबड आणि शौर्याची गडबड माझ्यासाठी गाणे गाण्याची असते.

स्नेहलता सांगते की शौर्याएवढे व्यक्त होण्याचे कारण कदाचित हे आहे की आम्ही खूप गप्पा मारतो, तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तिच्या पद्धतीने देते, मी तिला एवढेच सांगते की तुला राग येतो तेव्हा तू कशी चिडून बोलतेस, ओरडतेस तसेच जेव्हा एखाद्याची एखादी गोष्ट आवडते तेव्हा त्याला ते सांगायचे, समोरच्याचे कौतुक करायचे आणि हे तिला पटले. मुलांना कायम त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले की पटते असे तिला वाटते.

आई तर शौर्याची प्रिय आहेच पण जेव्हा पप्पा घरी असतात, तेव्हा त्यांना सुद्धा न दुखावता ही चिमुरडी स्वतःचा वेळ त्यांनाही देते. ती प्रत्येकाला तिच्या आयुष्यात महत्त्व देते. कधीही असे वाटत नाही की तिच्यासाठी फक्त आईच महत्त्वाची आहे. ती पप्पा ना त्यांच्या वेळेनुसार वेळ देते.आजीला सुद्धा जगायला लावते. हे सांगताना स्नेहलताच्या डोळ्यातले आनंदाश्रू त्या लपवू शकल्या नाही. या दोघींच्या खऱ्या आयुष्यातली धम्माल मस्ती पहायची असेल तर "चला हवा येवु दया"चा "children's special episode"पाहायला विसरू नका