- Suvarna Jainएरव्ही बॉलिवूडच्या अभिनेत्री बोल्ड आणि ब्युटीफुल ड्रेस परिधान करत रसिकांना घायाळ करत असतात. मात्र फक्त मेकअप आणि ड्रेसमध्येच या अभिनेत्री सुंदर दिसतात असे नाहीये जेव्हा या अभिनेत्री जीन्स टॉप घालत स्पोर्टी लूकमध्ये दिसतात तेव्हाही त्या तितक्याच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसतात. सध्याच्या आघाडीच्या नायिका स्टाइलवरही खूप फोकस करताना दिसतात. पिग्गी चॉप प्रियांका चोप्रा असो किंवा मग दीपिका पादुकोण. अनुष्का शर्मा असो किंवा मग आलिया भट्ट असे या अभिनेत्री जीन्स टॉपमध्येही तितक्याच स्टायलिश आणि अट्रॅक्टीव्ह दिसतात. जितक्या त्या एका वनपीसमध्ये ग्लॅमसर दिसतात तिकक्याच घायाळ करणारा त्यांचा अंदाज असतो. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण एअरपोर्टवर दिसली. त्यावेळी ती अगदी डिसेंट लूकमध्ये होती. सिंपल एंड सोबर अशा काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स तिने परिधान केली होती, डोळ्यावर गॉगल हातात तर जॅकेट आणि पायात स्निकर घालत ती आणखी सुंदर दिसत होती.तर दुसरीकडे चार्मिंग आलिया भट्टही जितकी तिच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते तितकीच ती आता तिच्या स्टाइलमुळेही आवडू लागली आहे. ट्रेडिशनल असो किंवा मग वेस्टर्न आऊटफिट सगळ्या प्रकारच्या आऊटफिटमध्ये आलिया तितकीच क्युट दिसते. एका कार्यक्रमात जास्त अॅक्सेसरीज न घालता फक्त कलरफुल टॉप आणि जीन्समध्ये स्पोर्टी लूकमध्ये दिसली. अतिशय साध्या पण तितकाच कम्फर्ट असणाऱ्या गेटअपमध्ये आलिया खूप चार्मिंग दिसत होती.अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीमुळे खूप चर्चेत असते. मात्र जेव्हा अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' सिनेमात पदार्पण केले. तेव्हा ती सोबर अंदाजात दिसली. आज सुल्तान गर्ल बनलेल्या अनुष्काचा अंदाजही दिवसेंदिवस अट्रॅक्टिव्ह वाटतोय. एका कार्यक्रमात सिंपल पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये ती भाव खावून गेली. विशेष म्हणजे टॉपला मॅचिंग असणारे स्निकरही (फुटवेअर) तिने घातले होते. त्यामुळे तिची पर्सनॅलिटीही स्टायलिश वाटत होती. सोबर स्टाइल लूकमध्ये तिने लाईट गुलाबी रंगाची लिपस्टीक लावत स्वत:ला डिसेंट लूकमध्ये प्रेझेंट करताना दिसली.या सगळ्या अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफचाही आवर्जुन उल्लेख करावा लागेल. एका एव्हेंटमध्ये निळ्या रंगाचा जॅकेट, पांढऱ्या रंगाचा टॉप आणि हिल असणारे काळ्या रंगाचे शूजमध्ये तिचा लूक क्लासी दिसत होता. या सगळ्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच ''स्टाइल में रेहने का' म्हणत चाहत्यांना त्यांच्या नजरा आकर्षित करण्यास भाग पाडतात.
अभिनेत्रींचा क्लासीलूक
By admin | Updated: January 29, 2017 02:45 IST