Join us

‘चिमाजी आप्पा’ ने केले ‘बाजीराव-मस्तानी’चे अनुभव शेअर

By admin | Updated: December 28, 2015 03:14 IST

हिंदीमध्ये बिगबजेटचे चित्रपट करायला मिळावेत, असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, पण ते पूर्ण होतेच असे नाही. या बाबतीत ‘कॉफी बॉय’ वैभव तत्ववादी जामच लकी ठरला आहे

हिंदीमध्ये बिगबजेटचे चित्रपट करायला मिळावेत, असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, पण ते पूर्ण होतेच असे नाही. या बाबतीत ‘कॉफी बॉय’ वैभव तत्ववादी जामच लकी ठरला आहे. पहिलाच हिंदी चित्रपट तोही संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव-मस्तानी’. मग काय भाग्य फळफळलेच म्हणायचे. दीपिका-रणबीर यांच्यासोबतचे काही अनुभव शेअर करताना तो सांगतो, एक शॉट असा होता की, बाजीराव पेशव्यांचा लहान भाऊ चिमाजी हा मस्तानी बाजीरावांना भेटायला आली की, तिचा सतत अपमान करीत असतो. या सीनमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन दिले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी काय म्हणतील, याचे खूप टेन्शन आले होते. मात्र, दीपिकाने सांगितले की, हा सीन खूप छान झालाय आणि सरांना तो नक्कीच आवडेल. दीपिकाचे म्हणणे खरे ठरले. तो शॉट पूर्ण झाल्यावर, पुन्हा पाहताना भन्साळींनी ‘वाह चिमाजी! ’ म्हणून शाबासकी दिली. त्या दिवसापासून ते मला ‘चिमाजी’ म्हणूनच हाक मारायला लागले, तसेच एका सीनमध्ये बाजीराव चिमाजीवर शस्त्र फेकून मारतात. हा शॉट ज्या पद्धतीने दिला, त्यावर रणबीरदेखील फिदा झाला आणि त्याने मला मिठीच मारली. वैभवच्या ‘बाजीराव-मस्तानी’मधील कामाची सर्वांनीच प्रशंसा केली असून, या भूमिकेमुळे हिंदी चित्रपटाची कवाडं त्याला खुली झाली आहेत. हिंदीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणे, आता त्याच्यासाठी नक्कीच मुश्कील नाही. पाहूयात हिंदीमध्ये तो कसा जम बसवतो ते!