Join us  

या कारणामुळे राखी यांचं आयुष्य उध्वस्त झालं, जाणून घ्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 5:28 PM

गुलजार यांनी अभिनेत्री राखीसोबत 15 मे 1973 रोजी दुसरे लग्न केले होते. 13 डिसेंबर 1973 साली मुलीच्या जन्मानंतर दोघांनी वेगळे राहायला सुरुवात केली.

70 च्या दशकात अनेक सुंदर अभिनेत्री होत्या आणि त्यापैकी एक राखीगुलजार होत्या. ज्यांनी आपल्या अदाकारीसोबतच आपल्या सौंदर्यानेही रसिकांची मनं जिंकली.पहिल्या चित्रपटातूनच त्यांना प्रचंड यश मिळाले. राखी यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. मुख्य नायिकेपासून ती अनेक चित्रपटांमध्ये आई आणि आजीच्या भूमिकेतही झळकल्या आहेत.

राखी गुलजार त्यांच्या आयुष्याविषयी अनेक किस्से चर्चेत असतात.  गुलजार यांनी एका रात्री राखी यांना हॉटेलच्या रुममध्ये इतकी मारहाण केली होती की, राखी यांचे पूर्ण शरीर नीळे पडले होते असेही बोलले जाते. 1975 साली 'आंधी'  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा किस्सा घडला होता. शूटिंगसाठी गुलजार  चांगल्या लोकेशनच्या शोधात काश्मीरला गेले. त्यावेळी राखीही त्याच्यासोबत होत्या. गुलजार आपल्या कामात व्यस्त  असायचे, राखी एकट्या पडायच्या.  

काश्मिरमध्ये असताना एकदा सुचित्रा सेन आणि संजीव कुमार पार्टी करत होते. त्यावेळी संजीव कुमार हे दारुच्या धुत होते.नशेत त्यांनी अचानक सुचित्रा यांचा हात पकडला. हे पाहून गुलजार यांनी नशेत बुडालेल्या संजीव कुमारपासून सुचित्राची सुटका केली आणि त्यांना रुमपर्यंत सोडवून येत होते तेव्हा राखीने त्यांना तेथून बाहेर निघताना गुलजार यांना पाहिले. राखीचा चांगलाच पारा चढला आणि त्यांनी तिथेच गुलजार यांना जाब विचारायला सुरुवात केली. दोघांमध्ये सुरु असलेला वाद पाहून हॉटेलमध्ये स्टाफची गर्दी जमा झाली होती. 

राखी यांना जाणून घ्यायचे होते की गुलजार सुचित्राला सोडवायला रुमपर्यंत का गेले, ही गोष्ट पसरू नये म्हणून गुलजार यांनी ते सांगण्याचे टाळले आणि तिथेच राखी यांचा गोंधळ सुरु झाला. सर्वांसमोर झालेला तमाशा पाहून गुलजार यांना फार राग आला आणि त्यांनी राखीला हॉटेलच्या रुममध्ये नेऊन खूप मारहाण केली होती.गुलजार यांनी अभिनेत्री राखीसोबत 15 मे 1973 रोजी दुसरे लग्न केले होते. गुलजार यांना राखी यांनी चित्रपटात काम करु नये अशी इच्छा होती. 13 डिसेंबर 1973 साली मुलीच्या जन्मानंतर दोघांनी वेगळे राहायला सुरुवात केली. 

टॅग्स :राखीगुलजार