Join us  

"बाहुबली 2" पाहण्यासाठी चार्टर प्लेनने पोहोचले 40 बांगलादेशी फॅन्स

By admin | Published: May 03, 2017 5:27 PM

"बाहुबली 2" हा बहुप्रतिक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला. अखेर दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना बाहुबलीने कटप्पाला का मारलं याचं उत्तर मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - "बाहुबली 2" हा बहुप्रतिक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला. अखेर दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना बाहुबलीने कटप्पाला का मारलं याचं उत्तर मिळत आहे.
 
या सिनेमाचं क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. याचा अंदाज तर बॉक्स ऑफीसचे आकडे पाहिल्यानंतर लक्षात येतच. या सिनेमाने आतापर्यंत भारतीय सिनेमाचे जवळपास सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. सिनेमा पाहण्यासाठी काहीही करण्याची प्रेक्षकांची तयारी आहे. याचं ताजं उदाहरण मंगळवारी पाहायला मिळालं.
 
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंगळवारी "बाहुबली 2" पाहण्यासाठी जवळपास 40 बांगलादेशी चाहत्यांनी चक्क चार्टर प्लेनने प्रवास करून कोलकाता गाठलं. या सिनेमाची 2 वर्षांपासून वाट पाहात होतो असं यातील एकाने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. 
या सिनेमाने चार दिवसात 620 कोटींची कमाई केली आहे. जगभरात हा चित्रपट जवळपास 9000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.  तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेसह 6 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला.
 
("बाहुबली"मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून)
 
एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या भव्यदिव्य चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, तमन्न, सत्यराज यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत.