राखीपौर्णिमा हा प्रत्येक बहीण-भावाच्या आयुष्यातील आवडता सण. भावा-बहिणीच्या नात्यात दरवर्षी एकापेक्षा अनेक आठवणींची भर घालणारा हा दिवस. प्रत्येक भावा बहिणीला हवासा वाटणारा हा सण. मग यामध्ये आपले लाडले सेलिब्रिटी मागे राहिले तरच नवल. शूटिंग्ज आणि टाईट शेड्यूलमधून आजच्या दिवशी खास वेळ काढून हे भाऊ आपल्या बहिणीकडे जातात आणि आवर्जून राखी बांधून घेतात; तर काही भाऊ आपल्या बहिणीला ‘सरप्राईज’ देण्यासाठी थेट बहीण ज्या शूटिंगच्या सेटवर असतात तिथे पोचतात आणि तिचा दिवस अविस्मरणीय करतात. असंच काहीसं सरप्राईज मिळालेली सोनाली कुलकर्णी सांगते, राखीपौर्णिमा हा प्रत्येकच बहिणीला हवाहवासा वाटणारा दिवस असतो. पण जेव्हा आपण या दिवशीही शूटिंगमध्ये बिझी असतो आणि आपला भाऊ अचानक सेटवर येऊन आपल्याला सरप्राईज करतो तो क्षण मेमोरेबल ठरतो.’ तर भूषण प्रधान त्याच्या बहीण-भावांबद्दल सांगतो. आपण खरोखरच रेनबोप्रमाणे ७ रंग आहोत आणि अशा बहीण-भावांनी त्याचे आयुष्य इंद्रधनुष्याप्रमाणे ७ रंगांनी भरून टाकल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे उडत्या पक्ष्याकडून समजते.
सेलिब्रिटींचे रक्षाबंधन
By admin | Updated: August 30, 2015 23:41 IST