Join us

कृतीला कॅटरिनाची प्रेरणा

By admin | Updated: September 12, 2014 23:44 IST

अभिनेत्री कृती सनोन सध्या अक्षय कुमारसोबतच्या सिंह इज ब्लिंग या चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे.

अभिनेत्री कृती सनोन सध्या अक्षय कुमारसोबतच्या सिंह इज ब्लिंग या चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. अक्षय आणि कॅटरिनाची जोडी कृतीने अनेक चित्रपटांत पाहिली आहे, त्यामुळे कॅटरिना तिची फेवरेट अ‍ॅक्ट्रेस आहे. म्हणूनच सिंग इज किंगमधील तेरी ओर या गीताप्रमाणेच एखादे गाणे तिच्या चित्रपटातही असावे, अशी तिची इच्छा आहे. सिंह इज किंगमधील तेरी ओर हे गाणे कृतीला खूप आवडते. तिच्या मते, या गाण्यात कॅटरिनाने उत्तम अभिनय केला आहे. त्यामुळे असेच एखादे गाणे तिच्यावर आणि अक्षयवर चित्रित करावे, अशी तिची इच्छा आहे. तिने अक्षयला इच्छा बोलून दाखवली. अक्षयनेही तिला आश्वासन दिले आहे.