Join us  

बॉलिवूड चित्रपटांमध्ये शारीरिक शोषणाव्यतिरिक्त दाखवावी ही गोष्ट, झोया अख्तरने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 5:56 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरने बॉलिवूडमध्ये सेक्स व महिलांच्या शारिरीक शोषणाच्या चित्रणावर नुकतेच भाष्य केले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरने बॉलिवूडमध्ये सेक्स व महिलांच्या शारिरीक शोषणाच्या चित्रणावर नुकतेच भाष्य केले आहे. बॉलिवूड चित्रपटामध्ये फक्त महिलांचे शारीरिक शोषण दाखवले जाते, महिलांच्या संमतीने झालेले संबंध दाखवले जात नाहीत, असे मत झोया अख्तरने व्यक्त केले आहे. 

झोया अख्तरने याबाबत सांगितले की, बॉलिवूडमध्ये अनेक वेळा महिलांच्या लैंगिक शोषणावरच भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जाते. मात्र परस्पर संमतीने झालेले शरीरसंबंध फार क्वचित वेळा दाखविले जातात. त्यामुळे सहाजिकच लहान वयात मुलांना बलात्कार,लैंगिक अत्याचार या सारख्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो.

हिंदी चित्रपटांमध्ये महिलांवरचे अत्याचार, शोषण चालतात पण संमतीने केलेल्या सेक्सचे दाखवले जात नाही. किशोरवयात येत असताना मी पाहिलेल्या अनेक चित्रपटांमध्ये बलात्कार, महिलांचं लैंगिक शोषण यासारख्याच गोष्टींचा भरणा असायचा. मात्र एखाद्या महिलेच्या संमतीने झालेल्या शरीर संबंधांचे सीन फार कमी वेळा दाखविले जायचे. विशेष म्हणजे जर असे सीन आले तर अनेक वेळा ते आम्हाला घरातले पाहु देत नव्हते. त्यामुळे किशोरवयातील मुलांना केवळ बलात्कार, लैंगिक शोषण याच गोष्टी समजतात आणि त्यांची स्त्रीकडे पाहण्याची मानसिकताही तशीच होते. महिलांच्या संमतीने झालेले संबंध त्यांना कधी कळतच नाहीत, त्यामुळे महिलांचा आदर करणे ही मानसिकताच त्यांच्यात निर्माण होत नाही, असे झोयाने सांगितले.

पुढे झोया म्हणाली की, मुळात याच मानसिकतेमुळे समाजाचा दृष्टीकोन, त्यांच्यातील मानसिकता मरण पावत चालली आहे आणि समाजात बलात्कारसारखे प्रकरणे घडत आहेत. जर दोन व्यक्तींच्या संमतीने झालेले संबंधांसारखे सीन दाखवले तर समाजाचा दृष्टीकोनही बदलेल. बलात्काराचे प्रमाण कमी होईल. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही हे चित्रपटातून दाखविले पाहिजे. जर स्त्रियांचा आदर कसा करावा हे चित्रपटाच्या माध्यमातून समजले तर समाजाच्या मानसिकतेमध्येही बदल होईल.