Join us  

यंदा ‘या’ सेलेब्सचे कमबॅक ठरणार अविस्मरणीय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 4:30 PM

गेल्यावर्षी अभिषेक बच्चन, करिना कपूर, राणी मुखर्जी आदी दिग्गज स्टार्सचा कमबॅक केला होता. या सर्वांनी आपल्या परफॉर्मन्सने आपले मन जिंकून घेतले होते. यातील काही जणांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकले नाही, मात्र काही जणांचे चित्रपट सुपरहिट ठरले. अशाच पद्धतीने काही स्टार्स यंदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये दरवर्षी नव्या-जुन्या अ‍ॅक्टर्सचे येणे-जाणे सुरुच असते. एकीकडे प्रत्येकवर्षी स्टारकिड्स आणि बरेच नवे अ‍ॅक्टर्स इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतात तर दुसरीकडे काही स्टार्स बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे इंडस्ट्रीपासून दूर जातात. या सर्वांची त्यांच्या चाहत्यांना त्यांची येण्याची मोठी प्रतीक्षा असते. गेल्यावर्षी अभिषेक बच्चन, करिना कपूर, राणी मुखर्जी आदी दिग्गज स्टार्सचा कमबॅक केला होता. या सर्वांनी आपल्या परफॉर्मन्सने आपले मन जिंकून घेतले होते. यातील काही जणांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकले नाही, मात्र काही जणांचे चित्रपट सुपरहिट ठरले. अशाच पद्धतीने काही स्टार्स यंदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कदाचित त्यांचे हे कमबॅक अविस्मरणीय ठरु शकते.  

* स्रेहा उलालसलमान खानच्या ‘लकी : नो टाइम फॉर लव’ चित्रपटाद्वारा डेब्यू करणारी स्रेहा उलाल बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी स्रेहा, डिजिटल प्लेटफॉर्मवर काहीतरी आगळेवेगळे करण्याची इच्छा मनात बाळगून आहे. तिचे म्हणणे आहे की, बॉलिवूडमध्ये सध्या महिलांचा बोलबाला आहे आणि तिला या वेळेची सुरूवातीपासून प्रतीक्षा होती. स्रेहाला एका गंभीर आजाराने ग्रासले होते, म्हणून ती बॉलिवूडपासून दूर होती, असे म्हटले जात होते. मात्र आता ती कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

* फैजल खानआमिर खानचा भाऊ फैजल खान बऱ्याच काळापासून चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. फैजलला २००० मध्ये आलेल्या ‘मेला’ चित्रपटात आमिर आणि ट्विंकल खन्ना सोबत पाहण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार आता १९ वर्षानंतर फैजल बॉलिवूडमध्ये ‘फॅक्ट्री’ चित्रपटातून कमबॅक करतोय. यात फैजल फक्त अ‍ॅक्टिंगच करणार नाही तर गाणेदेखील गाणार आहे. तो 'इश्क तेरा...' हे गाणे गाणार आहे, असे समजते.  

* डिनो मोरिया‘राज’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता डिनो मोरिया तब्बल नऊ वर्षानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. डिनो लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्याशिवाय त्याच्याजवळ एक बॉलिवूड चित्रपटही आहे. १९९९ वर्षी आलेल्या ‘प्यार में कभी कभी’ ह्या चित्रपटामधून डिनोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.  

* माधुरी दीक्षितबॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच अजय देवगन स्टारर ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसणार आहे. माधुरी २०१४ मध्ये ‘गुलाब गॅँग’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर एका टीव्हीच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाली होती. पाच वर्षानंतर माधुरीचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट असणार आहे.   

* प्रभु देवाप्रभु देवा भारताच्या उत्कृष्ट कोरिओग्राफर्समधला एक आहे. प्रभु डान्सिंगसोबतच अ‍ॅक्टिंगमध्येही पारंगत आहे. त्याने शेवटी २०१५ मध्ये रेमो डिसुजाच्या ‘एबीसीडी 2’ मध्ये काम केले होते. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा रेमोच्या ‘स्ट्रीट डांसर्ज’ चित्रपटाद्वारा कमबॅक करतोय.  

टॅग्स :माधुरी दिक्षितडिनो मोरियाप्रभू देवा