Join us  

 चाहत्याचा अपमान करणे यामी गौतमच्या अंगलट, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 3:16 PM

होय, गुवाहाटी विमानतळावर यामीने असे काही केले की, ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

ठळक मुद्देयामीच्या चेह-यावर मास्क होता. पण तिची नाराजी लपली नाही. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमे-यात कैद केली

‘बाला’ फेम अभिनेत्री यामी गौतम सध्या एका वादात अडकली आहे. होय, गुवाहाटी विमानतळावर यामीने असे काही केले की, ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. यामीने आसामच्या संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप ट्रोलर्सनी केला. हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच यामीने माफी मागितली. पण तरीही लोकांची नाराजी दूर झाली नाही.सोशल मीडियावर यामीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला लक्ष्य केले. या व्हिडीओ गुवाहाटी विमानतळावरचा आहे. गुवाहाटी विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी यामीचे पारंपारिक स्वागत केले. याचदरम्यान एका चाहत्याने तिला ‘गमोसा’ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘गमोसा’ घालणा-या चाहत्याला यामीने रागात दूर लोटले.

यावेळी यामीच्या चेह-यावर मास्क होता. पण तिची नाराजी लपली नाही. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमे-यात कैद केली आणि यानंतर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच यामी नेटक-यांच्या निशाण्यावर आली. अनेकांनी तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले.अर्थात ग्रेट गुवाहाटी मॅराथॉन 2020च्या फ्लॅग आॅफदरम्यान यामीने ‘गमोसा’ स्वीकारला. सोशल मीडियावर याचा एक फोटोही तिने पोस्ट केला.

यामी म्हणते, मी स्वसंरक्षणासाठी तसे वागले

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर यामीने याप्रकरणी खुलासा केला. ‘कुणाच्याही भावना दुखावण्याचा वा संस्कृतीचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी केवळ स्वसंरक्षणासाठी तसे वागले. एक महिला या नात्याने कुणी जास्त जवळ आल्यास मी अस्वस्थ होते. कदाचित माझ्या ठिकाणी अन्य कुठलीही मुलगी वा महिला असती तर तिनेही हेच केले असते. कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही पण एखाद्याचे वर्तन आवडले नाही तर त्याविरोधात बोलणे वा ते थांबवणे गरजेचे आहे, ’ असे यामीने म्हटले. मी तिसºयांदा आसामला गेले होते. आसामच्या संस्कृतीवर माझे प्रेम आहे, असेही ती म्हणाली.

टॅग्स :यामी गौतम