Join us

पूरबला करायचेय डिप्पीसोबत काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:04 IST

 पूरब कोहली याचे बोटावर मोजण्याइतके काही चित्रपट आहेत. मात्र उत्तम अभिनय, मोजक्याच भूमिका हे त्याचे विशेष आहे. आता त्याचे ...

 पूरब कोहली याचे बोटावर मोजण्याइतके काही चित्रपट आहेत. मात्र उत्तम अभिनय, मोजक्याच भूमिका हे त्याचे विशेष आहे. आता त्याचे म्हणणे आहे की,‘ त्याला दीपिका पदुकोन सोबत काम करावयाचे आहे. खरंतर, तो आगामी जाहीरातीमध्ये तिच्यासोबत काम करणार आहे.त्यांनी याअगोदर एका कॉफीच्या जाहीरातीसाठी काम केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे अनेकांनी कौतुक केले. जाहीरातीसोबतच त्याला आता तिच्यासोबत चित्रपटातही काम करायला मिळण्याची शक्यता आहे. तिच्यासोबत काम करायला मला नेहमीच आवडते.’