Join us  

घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी सिन्हा करणार का साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 2:08 PM

यावर्षांत आपल्या अ‍ॅक्शनपटांमुळे चर्चेत राहिलेली सोनाक्षी सिन्हा नववर्षांत एक मोठा धमाका करणार आहे. होय,घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी बॉयफ्रेन्ड बंटी ...

यावर्षांत आपल्या अ‍ॅक्शनपटांमुळे चर्चेत राहिलेली सोनाक्षी सिन्हा नववर्षांत एक मोठा धमाका करणार आहे. होय,घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी बॉयफ्रेन्ड बंटी सजदेह याच्यासोबत साखरपुडा करणार असल्याची एकच चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. सोनाक्षी म्हणजे कायम बिनधास्त वागणारी-बोलणारी अभिनेत्री. वडिल शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच ती सुद्धा आपल्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. बी-टाऊन आणि मीडियाचे खरे मानाल तर येत्या फेबु्रवारीत सोनाक्षी बंटीसोबत साखरपुडा करू शकते. खरे तर सोनाक्षी आणि बंटीच्या रिलेशनशिपला सोनाच्या घरच्यांचा विरोध आहे.  त्याचे कारण म्हणजे,बंटीचे आधीच एक लग्न झालेय. पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट घेतलायं. याशिवाय सोना व बंटीच्या वयात बरेच मोठे अंतर आहे. पण सोना याबद्दल पुरती बेपर्वा दिसतेय. गेल्या काही महिन्यांपासून बंटी आणि सोनाक्षी यांच्यातील जवळीक आणखीच वाढली. अलीकडे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले. काही दिवसांपूर्वीही बंटी व सोनाक्षी यांचा साखरपुडा झाल्याची बातमी आली होती. अर्थात ही बातमी खोटी असल्याचे सोनाक्षीने स्पष्ट केले होते. एका मुलाखतीत सोनाक्षीला बंटीसोबतच्या साखरपुड्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर सोनाक्षी चांगलीच संतापली होती. माझ्या बोटात तुम्हाला अंगठी दिसतेय का? मग या प्रश्नाला अर्थच काय? अशा शब्दांत साखरपुड्याची बातमी तिने नाकारली होती. पण आता पुन्हा एकदा सोनाक्षी व बंटीच्या साखरपुड्याची बातमी चर्चेत आहे.सन २०१२ पासून सोना व बंटी दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. बंटी हा सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानचा साळा आहे. म्हणजेच सोहेलची पत्नी सीमा हिचा भाऊ आहे. सोनाक्षीपूर्वीही दिया मिर्झा, नेहा धूपिया, सुष्मिता सेन अशा अनेकांसोबत बंटी रिलेशनशिपमध्ये होता. अंबिका चौहान हिच्यासोबत बंटीचे लग्न झाले होते. सलमान खानही या लग्नात सामील झाला होता. पण हे लग्न केवळ चार वर्षे टिकले. आता बंटी सोनाच्या पे्रमात आकंठ बुडाल्याची चर्चा आहे. आता या चर्चेत किती तथ्य ते येत्या फेबु्रवारीत कळेलच. तोपर्यंत प्रतीक्षा...!!