अक्षय कुमारवर का नाराज आहे मौनी रॉय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 10:21 IST
अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटाद्वारे मौनी रॉय बॉलिवूड डेब्यू करतेय, हे आपल्यापैकी सगळ्यांनाच ठाऊक आहे. या चित्रपटाचे शूटींगही ...
अक्षय कुमारवर का नाराज आहे मौनी रॉय?
अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटाद्वारे मौनी रॉय बॉलिवूड डेब्यू करतेय, हे आपल्यापैकी सगळ्यांनाच ठाऊक आहे. या चित्रपटाचे शूटींगही सुरु झालेय. पण यासोबतच एक चर्चाही कानावर येतेयं. होय, ही चर्चा म्हणजे, या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल मौनी नाखूश असल्याची. या चित्रपटात मौनी अक्षयच्या प्रेयसीच्या भूमिकेत असल्याचे कळतेय. यातील मौनीची भूमिका अतिशय लहान आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे अक्षय कुमार, अमित साध, सनी कौशल आणि कुणाल कपूर यांच्या अवती-भवती फिरणारी असल्याने मौनीला यात काहीही करण्यासारखे नाही. याचमुळे मौनी नाराज असल्याची चर्चा आहे.अर्थात ही चर्चा मौनीने धुडकावून लावली आहे. ‘गोल्ड’ भूमिकेवर मी नाराज आहे, ही बातमी ऐकून मला स्वत:ला आश्चर्य वाटतेय. अशा बकवास बातम्या कुठून उठतात, मला ठाऊक नाही. काही लोक माझा द्वेष करतात, हेच या बातम्यांवरून कळते. मी केवळ इतकेच म्हणेल की, चित्रपट रिलीज व्हायची प्रतीक्षा करा. या चित्रपटात मला संधी मिळाली, याबद्दल मी अतिशय आनंदी आणि आभारी आहे, असे मौनी म्हणाली. अर्थात या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगण्यास मौनीने नकार दिला. मी तूर्तास भूमिकेबद्दल काहीही सांगू शकत नाही, असे ती म्हणाली.एकंदर काय तर ‘गोल्ड’ रिलीज होण्याआधीच मौनी या ना त्या कारणाने चर्चेत आहे. यापूर्वी सलमान खानच्या वशिल्याने मौनीला ‘गोल्ड’ मिळाला, अशा बातम्या आल्या होत्या. अर्थात मौनीने या बातमीचेही खंडन केले होते. केवळ तिनेच नाही तर चित्रपटाचा निर्मात रितेश सिधवानी यानेही ही खबर खोटी असल्याचे म्हटले होते. मौनीला कुणाच्याही वशिल्याने हा चित्रपट मिळाला नाही तर तिच्यातील टॅलेंटमुळे या चित्रपटासाठी तिची निवड झाल्याचे रितेशने सांगितले होते.