Join us

कॅटरिना कैफला मिळालेला स्मिता पाटील पुरस्कार का चुकीचा आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 15:10 IST

जान्हवी सामंतपहिल्यांदा पुरस्काराची घोषणा करण्याचा कालावधी चुकीचा आहे. बार बार देखो चित्रपट पाहिल्यानंतर हा कॅटरिनाच्या कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट ...

जान्हवी सामंतपहिल्यांदा पुरस्काराची घोषणा करण्याचा कालावधी चुकीचा आहे. बार बार देखो चित्रपट पाहिल्यानंतर हा कॅटरिनाच्या कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट असावा, असे मत समीक्षकांनी व्यक्त केल्यानंतर दोन आठवड्यात हा पुरस्कार देण्यात आला. दुसरे म्हणजे, स्मिता पाटील यांच्या ६१ व्या जयंतीच्या एक महिनाअगोदर या पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. सुमारे ३० वर्षापूर्वी स्मिता पाटील यांचे निधन झाले. तिचा मृत्यूलेख लिहायला देखील तिच्या चाहत्यांचे काळीज हेलावते. तांत्रिकदृष्ट्या दोघींच्या करिअरचे काही दुवे सारखे आहेत. १२ वर्षाच्या कारकीर्दीत दोघींनीही सुमारे ३० विविध चित्रपट केले.तुम्ही जरी कॅटरिनाचे प्रचंड फॅन असला तरीही हा पुरस्कार पचविणे अवघड जाते. एका बाजूला प्रचंड अभिनयक्षमता असलेली अभिनेत्री. एकाच वर्षात ‘भूमिका’ या चित्रपटामधील ग्लॅमरस भूमिका ते ‘जैत रे जैत’ मध्ये आदिवासी मुलीची भूमिका असा प्रचंड विरोधाभास असणारे विविध ३० चित्रपट स्मिता यांनी केले. (ज्यात कसम पैदा करने वाले की आणि डान्स डान्स हे चित्रपट गृहित धरलेले नाहीत) तर दुसºया बाजूला जिच्या पटलावर शीला की जवानी आणि चिकनी चमेली याचा समावेश आहे, अशी कॅटरिना आहे.कॅटरिना कैफला या ठिकाणी शुल्लक लेखण्याचा हेतू नाही.  पुरस्कार देणाºयांच्या मते गेली कित्येक वर्षे ती इंटरनेटवरील सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेली सेलेब्रिटी आहे. त्याशिवाय अनेक ‘हॉट’लाईन पोल्समध्येही ती अग्रेसर आहे. तिच्या प्रेरणेने २०१० आणि २०११ साली मॅटेलने बार्बी डॉलची दोन रुपे बाजारात आणली. ती खरच सुंदर आहे आणि तरीदेखील मॅडम कैफ या स्मिता पाटील नाहीत.स्मिता पाटील यांनी आपल्या छोट्याशा कारकीर्दीत जी उंची गाठली आहे, अशा अगदी कमी अभिनेत्री आहेत, ज्यांना हे साध्य झाले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी भूमिका या चित्रपटात काम केले. त्या काळी राष्टÑीय पुरस्कार मिळविलेल्या त्या सर्वात तरुण अभिनेत्री होत्या. त्यानंतरच्या दशकभरात त्यांनी भवानी भवईमध्ये उजम, गमनमध्ये खैरुन, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है मध्ये जोअन, नमक हलालमध्ये पूनम, शक्ती चित्रपटात रोमा, अर्थमध्ये कविता, बाजारमध्ये नज्मा, अर्ध सत्यमध्ये ज्योत्स्रा, मंडी चित्रपटात झीनत, उंबरठामध्ये सावित्री, आखिर क्योंमध्ये निशा, डान्स डान्समध्ये राधा, मिर्च मसाला चित्रपटात सोनबाईची भूमिका साकारली. या सर्व भूमिका दशकभरातील आहेत. जोपर्यंत पहिला राष्टÑीय पुरस्कार मिळत नाही, तोपर्यंत लग्न करणार नसल्याचे कॅटरिनाने गतवर्षी जाहीर केले.हा केवळ टॅलंटचा प्रश्न नाही. एक अभिनेत्री म्हणून स्मिता या अधिक प्रकर्षाने उठून दिसतात. त्या आपल्या चित्रपटातून दबलेल्या, पिचलेल्या, पिडीतांचा आवाज बनल्या. संघर्षरत, बेदरकार आणि प्रेरणादायी महिला पात्र साकारले. स्त्रीत्वासाठी त्या उभ्या राहिलेल्या दिसल्या. चमकत्या चेहºयांच्या अफाट सागरात त्या डार्क हॉर्स म्हणून संघर्ष करीत राहिल्या. ८० च्या दशकात सौंदर्याच्या ज्या परिभाषा होत्या, त्या बदलत स्वत:चे स्थान निर्माण केले. चमकत्या चेहºयांच्या नायिकाच या चित्रपटक्षेत्रात तग धरु शकतात, या कल्पनेला त्यांनी आव्हान दिले आणि आपले मत सिद्धही करुन दाखविले. काम करणाºया महिलांना अढळ स्थान निर्माण करुन देणाºया भूमिका त्यांनी मिर्च मसाला, अर्ध सत्य आणि नमक हलाल या चित्रपटातून साकारल्या. आज रपट जाए आणि हमने सनम को खत लिखा त्याचप्रमाणे आ गया आ गया हलवा वाला आ गया या गाण्यांमध्ये त्यांनी आपला आत्मा ओतला. स्वत:च्या चुकांबद्दलही त्या कायम राहिल्या. डान्स डान्स चित्रपटात भयानक वाटणारा चमकत्या लाल रंगाचा बॅगी टॉपदेखील त्यांनी घातला. कॅटरिना कोणासाठी उभी राहिलीय? बार्बी चिक, आयटम गर्ल्स, कॉस्मॅटिकचा वापर, बॉलीवूड हिरोईन्सचा इंग्लिश बोलण्याचा अधिकार यांच्यासाठी? यापेक्षा आणखी वाईट म्हणजे इतकी वर्षे बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतरही तिचे शब्दोच्चार थ्री इडिएट्समधील चतुरप्रमाणे राहिले आहेत. इतक्या वर्षानंतरही बॉलीवूड अभिनेत्रीचे यश हे तिच्या भूमिकेवरुन नाही तर तिने किती खानसोबत काम केले यावरुन ओळखावे लागते.स्मिता पाटील पुरस्कार दीपिका पादुकोण, विद्या बालन, करीना कपूर, प्रियंका चोप्रा यांनीही स्वीकारला आहे, मात्र कॅटरिनाच्या बाबतीतच हा प्रश्न का निर्माण झाला आहे?  स्मिता पाटील पुरस्कार कॅटरिना कैफला देणे म्हणजे नसीरुद्दीन शाह पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राला देणे किंवा सत्यजित रे पुरस्कार सलमान खानला देणे किंवा कमल हसन पुरस्कार तुषार कपूरला देण्यासारखे आहे, जो विचारसुद्धा आपण करु शकत नाही.