Join us  

...अखेर सोनम कपूर आपल्या सासूबद्दल का बोलू इच्छित नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 3:59 PM

अभिनेत्री सोनम कपूरने जितकी लोकप्रियता आपल्या अभिनयाने मिळविली, त्यापेक्षा कितीतरी लोकप्रियता तिने आपल्या फॅशन सेन्स आणि आलिशान लग्नामुळे मिळविली ...

अभिनेत्री सोनम कपूरने जितकी लोकप्रियता आपल्या अभिनयाने मिळविली, त्यापेक्षा कितीतरी लोकप्रियता तिने आपल्या फॅशन सेन्स आणि आलिशान लग्नामुळे मिळविली असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. लग्नानंतरही सोनम तिच्या सासरच्या मंडळींमुळे सातत्याने चर्चेत राहत आहे. बºयाचदा तिने पती आनंद आहुजासोबतच्या आपल्या नात्याविषयी बिंधास्तपणे सांगितले. मात्र सासू आणि सासºयांबद्दल तिला काही विचारले की, ते ती सातत्याने त्यावर बोलणे टाळताना दिसत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर ती अजूनही दिल्ली येथील सासरवाडीला गेली नाही. त्यामुळे यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात असेल तर त्यात नवल वाटू नये. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनम कपूरने यावरून चुप्पी तोडली आहे. तिने म्हटले की, सासू बीना आहुजासोबत माझे चांगले संबंध आहे. उलट त्यांच्यामध्ये मी खूपच लवकर मिसळली आहे. माझ्या सासरची मंडळी सिंधी आहे आणि त्यांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यात फिल्मी दुनिया नको आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आपल्या करिअर प्लॅनबद्दल सोनम कपूरने सांगितले की, मला एक महिला आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. यावेळी सोनमने याचादेखील खुलासा केला की, माझी बेस्ट फ्रेंड स्वरा भास्करविषयी मी बरेचसे प्लॅन आखले आहेत. त्याव्यतिरिक्त मी आलिया भट्टसोबत काम करण्यासही उत्सुक आहे. दरम्यान, सोनम कपूर सध्या लंडन येथे आहे. नुकताच तिने तिचा ३३वा वाढदिवस सेलिब्रेट केला. बहीण रिया कपूर, करिना कपूर, करिश्मा कपूर, आनंद आहुजा आणि सैफ अली खानसोबत ती याठिकाणीच सध्या हॉलिडे एन्जॉय करीत आहे. गेल्या आठवड्यातच तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूरने त्यांना ज्वाइन केले आहे. अर्जुन लंडनमध्ये त्याच्या ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातही त्याने वेळ काढून या सर्वांसोबत काही वेळ व्यतित केला. लंडनमधून परताच सोनम ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. त्यानंतर ती ‘जोया फॅक्टर’ची शूटिंग सुरू करणार आहे. नुकताच तिचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन केले.