Join us  

जेनिफर विंगेट करण सिंग ग्रोव्हरसोबत का झाली होती विभक्त?, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 7:50 PM

Jennifer Winget And Karan Singh Grover : मालिकेच्या सेटवर जेनिफर विंगेटची करण सिंग ग्रोव्हरशी भेट झाली होती. त्यानंतर तिने २०१२ मध्ये त्याच्यासोबत लग्न केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.

जेनिफर विंगेट हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी 'राजा को रानी से प्यार हो गया' चित्रपटात काम केले. जेनिफरने दिल मिल गए, बेहद, कही तो होगा आणि बेपन्नह यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या सिंगल लाईफचा आनंद घेत आहे. टीव्ही शोच्या सेटवरच तिची करण सिंग ग्रोव्हरशी भेट झाली होती. त्यानंतर तिने २०१२ मध्ये त्याच्यासोबत लग्न केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. आता इतक्या वर्षांनंतर जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटावर मौन सोडले आहे. यात कोणाचाही दोष नाही, असे ती सांगते.

करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटावर जेनिफरने बॉलिवूड बबलशी संवाद साधताना सांगितले की, 'मला विश्वास आहे की आम्ही दोघे यासाठी तयार नव्हतो. फक्त तो (करण सिंग ग्रोव्हर) किंवा मी नव्हते. आम्ही दोघेही ते पाऊल उचलायला तयार नव्हतो. आम्ही इतके दिवस मित्र होतो. प्रत्येक वेळी आम्ही भेटायचो, आम्ही घरात गोंधळ निर्माण करायचो, परंतु मला वाटते की ही एक दुर्दैवी वेळ होती.

वर्कफ्रंटबद्दल...जेनिफर विंगेटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती शेवटची 'कोड एम सीझन २' मध्ये दिसली होती. जो हिट ठरला.

करण बिपाशासोबत करतोय लाइफ एन्जॉय करण सिंग ग्रोव्हरने जेनिफरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ३० एप्रिल २०१६ रोजी बिपाशा बासूशी लग्न केले. लग्नाच्या ७ वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. आता हे जोडपे पालकत्वाचा आनंद घेत आहे.

टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरजेनिफर विगेंट