Join us  

मुलीच्या जन्माच्या आठ दिवसातच आयुष शर्माचा मोठा खुलासा, म्हणूनच तिच्या जन्मासाठी या दिवसाची केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 12:03 PM

आयुष शर्मा आणि अर्पिता खानने सलमानच्या वाढदिवशीच मुलीला जन्म देण्याचा निर्णय का घेतला हे तुम्हाला माहिती आहे का ?  

सलमान खनासाठी आता 27 डिसेंबर हा त्याचा वाढदिवस जास्त खास असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. सलमानच्या वाढदिवसच्या दिवशी त्याची बहीण अर्पिताने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आयुष शर्मा आणि अर्पिता खानने सलमानच्या वाढदिवशीच मुलीला जन्म देण्याचा निर्णय का घेतला हे तुम्हाला माहिती आहे का ?  

आजतकच्या रिपोर्टनुसार आयुष शर्माने या मागचा खुलासा केला आहे. आयुषने सांगितले की अर्पिता आणि मी जाणूनबुजून हा निर्णय घेतला. सलमानला बर्थ डे च्या दिवशी आम्हाला गिफ्ट द्यायचे होते आणि बाळाचे स्वागत करायचे होते. आयुषने खुलासा केला की अर्पिताची डिलेव्हरी डेट डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवरीचा पहिला आठवडा होता.

काही दिवसांपूर्वीता आयतचा सलमानसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. आज पापा आयुष शर्माने आयतचे आणखी काही फोटो शेअर केलेत.          आयत, या सुंदर जगात तुझे स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन आलीस. तू सर्वांच्या आयुष्यात कायम आनंद पेरशील, अशी आशा करतो,’ असे आयुषने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.

अर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे.

मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आता अहिलनंतर मामा सलमानचे अर्पिताच्या मुलीचे बॉन्डींग कसे बनणार हे ही पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :आयुष शर्मासलमान खानअर्पिता खान