Join us  

'झुंड' चित्रपटातील 'भावना भाभी' आहे तरी कोण?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:25 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund Movie) या चित्रपटामधील 'भावना भाभी' या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund Movie) चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या झुंडने सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या चित्रपटात भावना भाभीदेखील खूप भाव खाऊन गेली. या भावनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटामधील 'भावना भाभी' या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतलं. सायली पाटील (Sayali Patil) हिने भावनाची भूमिका साकारली आहे. सायली अभिनेत्रीसोबत आर्किटेक्टसुद्धा आहे. या चित्रपटातील तिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ घातली आहे. या चित्रपटातील कलाकारांची निवड नागराज मंजुळे आणि त्यांच्या भावाने मिळून केली आहे.

सायली पाटील ही सोशल मीडियावर सक्रीय असून इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळत आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

झुंड चित्रपटाबद्दल सांंगायचे या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १,५० कोटींचा गल्ला जमविला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत आणि आतपर्यंत झुंडने बॉक्स ऑफिसवर ९ कोटींचा बिझनेस केला आहे. 

टॅग्स :झुंड चित्रपटनागराज मंजुळेअमिताभ बच्चन