Join us  

जे रजनीकांत अन् बाहुबलीला करता आले नाही ते कटप्पाने केले; लंडनमध्ये केला हा कारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 9:44 AM

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कनक्लूजन’ने केवळ अभिनेता प्रभासलाच सुपरस्टार केले नाही, तर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टलाच भारतासह ...

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कनक्लूजन’ने केवळ अभिनेता प्रभासलाच सुपरस्टार केले नाही, तर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टलाच भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटाच्या यशाचे श्रेय संपूर्ण स्टारकास्टला जाते. विशेष ‘बाहुबली’चा सर्वात विश्वासू रक्षक कटप्पा या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. ६३ वर्षीय अभिनेता सत्यराजला कटप्पा या भूमिकेसाठी चक्क लंडनमध्ये सन्मानित करण्यात आले. वृत्तानुसार, सत्यराज यांचा वॅक्स स्टॅच्यू मॅडम तुसाद म्युझियममध्ये बसविला जाणार आहे. या म्युझियममध्ये त्यांचा कटप्पावाला अवतार बघावयास मिळणार आहे. लंडन म्युझियममध्ये असा सन्मान मिळविणारे सत्यराज हे पहिले तामिळ अभिनेते असणार आहेत. सत्यराज अगोदर प्रभासचा वॅक्स स्टॅच्यू बॅँकॉक येथील मॅडम तुसाद म्युझियममध्ये बसविण्यात आला आहे. प्रभास साउथ इंडस्ट्रीमधील पहिला असा अभिनेता आहे, ज्याचा वॅक्स स्टॅच्यू याठिकाणी बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत रजनीकांत, कमल हासन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनाही असा सन्मान मिळाला नाही. अशात प्रभास अन् सत्यराज यांना मिळालेला हा सन्मान सर्वोच्च म्हणावा लागेल. दरम्यान, सत्यराज यांची फॅमिली या वृत्तामुळे खूपच आनंदी आहे. त्यांच्या मुलाने ही आनंदाची बातमी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. ‘मला माझ्या वडिलांवर गर्व वाटतो’ अशा शब्दांत त्याने ट्विट केले. सत्यराज यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अभिनेता कमल हासनच्या ‘सत्तम एन काइल’ या १९७८ मध्ये आलेल्या चित्रपटातून केली. तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी शाहरुख खान स्टारर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या वडिलांचीही भूमिका साकारली. दरम्यान, सत्यराज यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.