Join us  

​कोण आहे कॅटरिनाचा फेव्हरेट अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 8:01 PM

बॉलिवूडमधील सर्व दिग्गज कलावंतासोबत कॅटरिना कैफने काम केले आहे. मात्र तिच्या आवडत्या कलाकारांत या शाहरुख, सलमान किंवा अमिताभ या ...

बॉलिवूडमधील सर्व दिग्गज कलावंतासोबत कॅटरिना कैफने काम केले आहे. मात्र तिच्या आवडत्या कलाकारांत या शाहरुख, सलमान किंवा अमिताभ या सारख्या बड्या कलावंताची नावे नाहीतच! मग तिचा आवडता कलावंत कोण? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला सुशांत सिंग राजपूत तिचा आवडता कलावंत असल्याचे कॅटरिनाने सांगितले आहे. सुशांत सिंग राजपूत ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी चांगलीच प्रसंशा मिळवितोय. त्याची प्रशंसा करणाºयात आता कॅटचाही समावेश झाला आहे. फेसबुक लाईव्ह चॅट करताना तिचा आवडता कलावंत कोण असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अधिक वेळ न घेता थेट सुशांतचे नाव घेतले. ती म्हणाली, सुशांत माझा आवडता कलावंत आहे. मी असे ऐकलेय त्याने एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरीमध्ये केलेला अभिनय अप्रतिम आहे. मी काही दिवसांपूर्वी माझा मित्र गट्टूला (अभिषेक कपूर) भेटली होती. त्यांनी मी अभिनय केलेल्या ‘फितूर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते म्हणाले होते. सुशांने या चित्रपटात खूपच चांगले काम केले आहे. सुशांत तुझे अभिनंदन!  ही गोष्ट सुशांतच्या कानावर येताच तो प्रचंड खुश झाला. तो म्हणाला, मला आशा आहे ती माझा चित्रपट लवकरच पाहील. आता मी कॅटरिनावाली ही गोष्ट माझ्या दिल्लीच्या मित्रांना सांगणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक म्हणून ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ चा उल्लेख केला जात आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक कमाई केली आहे. खुद्द महेंद्र सिंग धोनीने सुशांच्या अभिनयाची प्रसंशा केली होती.