Join us  

तैमूर वडिल सैफ अली खानसोबत दिसला शेती करताना, फोटो होतायेत व्हायरल

By तेजल गावडे | Published: November 07, 2020 6:32 PM

सैफ अली खान आणि तैमूर यांच्या शेतातील या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड तैमूर अली खानचे फोटो व व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता त्याचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात तो नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसतो आहे. तैमूर अली खान आता त्याचे वडील सैफ अली खानच्या कामात मदत करताना दिसतो आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात तैमूर अली खान वडील सैफ अली खान यांच्यासोबत शेतात काम करताना दिसतो आहे.  

तैमूर अली खान आणि सैफ अली खानचे हे फोटो वुम्पलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सैफ अली खान शेतात काम करताना दिसतो आहे आणि तैमूर त्याला मदत करताना दिसतो आहे. त्यांचे चाहते या फोटोंना पसंती देत आहेत. कमेंट्सच्या माध्यमातून रिएक्शन देत आहेत. काही मिनिटांत या फोटोंना हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेही तैमूरचे फोटो व्हायरल होत असतात.

सैफ अली खानने नुकतेच तैमूरबद्दल बोलताना सांगितले होते की, मला वाटते की त्याला माहित झाले की इथे काही ठिकाणी कॅमेरे नक्कीच असणार. त्याला कधीही फोटो क्लिक करायला जास्त आवडत नाही. इतकेच नाही तर घरीही. पण त्याला समजते. माझे म्हणणे आहे की जेव्हा कॅमेरा फ्लॅश होतो तेव्हा तो स्माइल करतो. पण तो या गोष्टी नेहमी पाहतो. याबद्दल तो जास्त विचार करत नाही. ही गोष्ट थोडी मजेशीर आहे की ज्या घरात आम्ही राहतो ते पूर्ण भरलेले आहे. प्रत्येक ठिकणी पेटिंग्स, पुस्तक आणि बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याने या गोष्टीमध्ये त्याच्यासाठी जागा बनवली आहे. त्याने कधीच कोणती गोष्ट तोडली नाही.

सैफ अली खान शेवटचा दिल बेचारा चित्रपटात झळकला होता. चित्रपटात भलेही त्याचा छोटा रोल होता, पण त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यापूर्वी तो तान्हाजी द अनसंग वॉरियर आणि जवानी जानेमन चित्रपटात झळकला होता. 

टॅग्स :सैफ अली खान तैमुर