Join us

आपल्या लेडी लव्हच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी विराट कोहली कुठे जात असावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 20:01 IST

अनुष्का शर्मा अन् तिचा बॉयफ्रेण्ड विराट कोहली सध्या ‘खुल्लमखुल्ला प्यार करेंगे’ अशाच काहीशा मुडमध्ये दिसत आहेत. कारण आपल्या बिझी ...

अनुष्का शर्मा अन् तिचा बॉयफ्रेण्ड विराट कोहली सध्या ‘खुल्लमखुल्ला प्यार करेंगे’ अशाच काहीशा मुडमध्ये दिसत आहेत. कारण आपल्या बिझी शेड्यूल्डमधून वेळ काढून हे दोघेही सध्या दूर कुठेतरी भटकायला निघाले असून, आपल्या लेडी लव्ह अनुष्काच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठीच विराटकडून हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे समजते. वास्तविक गेल्या महिन्याच्या २९ तारखेलाच अनुष्काने तिचा २९ वा बर्थ डे सेलिब्रेट केला. त्यावेळी दोघेही त्यांच्या कमिटमेंटमध्ये व्यस्त असल्याने त्यांना एकत्र बर्थ डे सेलिब्रेट करता आला नाही; मात्र आता विराट एका चागंल्या बॉयफ्रेण्डचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अनुष्काचा बर्थ डे जल्लोषात सेलिब्रेट करू इच्छितो. त्यासाठीच हे दोघे कुठेतरी बाहेर निघाले आहेत. नुकतेच या दोघांना मुंबई विमानतळावर बघण्यात आले. दोघेही एकमेकांसोबत खूपच कम्फर्ट दिसत होते. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वीच मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार विराट अनुष्काच्या बर्थडेला तिला लग्नासाठी प्रपोज करणार होता; मात्र नंतर ही अफवा असल्याचे समोर आले. परंतु आता ज्या पद्धतीने विराट आणि अनुष्का एकत्र बघावयास मिळाले त्यावरून विराट अनुष्काला लग्नाची मागणी घालू शकतो, असेच काहीसे चित्र बघावयास मिळाले. खरं तर विराट आणि अनुष्का यांच्यातील रोमान्स कधीच लपून राहिला नाही. कारण बºयाचदा हे दोघे सोशल मीडियावर लवी-डवी मोमेंट शेअर करीत असतात. विराटने तर त्याच्या प्रोफाइलवर अनुष्कासोबतचा फोटो अपलोड करून टीकाकारांची बोलती बंद केली होती. शिवाय जेव्हा-केव्हा या दोघांना एकत्र बघण्यात आले तेव्हा दोघेही एकमेकांसोबत खूपच कम्फर्ट असल्याचे बघावयास मिळाले. दोघांची फॅशन स्टाइलही खूपच युनिक आहे. दोघेही एकमेकांना चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतात. आता असाच काहीसा नजारा बघावयास मिळाला. अनुष्काने पिंक रंगाचा ट्यूनिक घातला, तर विराटने त्याला मॅचिंग असा कॅज्युअल चेक टी-शर्ट घातला होता. अनुष्का आणि विराट यांनी अद्यापपर्यंत त्यांच्यातील रिलेशनशिपला आॅफिशियल केले नाही; मात्र दोघांमधील आॅफ स्क्रीन केमिस्ट्री पाहता ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र या चर्चाही अफवाच ठरल्या. आता या दोघांनी लग्नाच्या बंधनात अडकावे अशीच काहीशी त्यांच्या फॅन्सची इच्छा असेल.