Join us  

नीना गुप्ताला गरोदर असताना या अभिनेत्याने केले होते प्रपोज, द्यायला तयार होता बाळाला नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 3:37 PM

नीना यांनी लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देवेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

नीना गुप्ता या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी गंभीरपासून ते विनोदी भूमिकांपर्यंत सर्व भूमिका साकारल्या आहेत. नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. वेस्ट इंडियाचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्यांच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला . 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता.

नीना यांनी लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. त्या गरोदर असताना अभिनेता सतिष कौशिक यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. तुझ्या मुलाला मी नावन असे त्यांनी म्हटले होते. पण नीना यांनी बाळाला एकटेच सांभाळण्याचे ठरवले. नीना गुप्ता आणि सतीश कौशिक या दोघांनी जाने भी दो यारों, मंडी या फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे.

वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होते. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियन यांनी. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. विवियन नीना यांच्या प्रेमात आकंठ बुडाला होते. पण त्यांना आपले लग्नही तोडायचं नव्हते. त्यामुळे त्यांनी नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.

टॅग्स :नीना गुप्ता