Join us  

सुशांतच्या घरात रिया चक्रवर्तीचे फोटो आणि व्हिडीओ शूट करायचा सिद्धार्थ पिठानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:48 AM

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीचे नाव खूप चर्चेत आहे

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीचे नाव खूप चर्चेत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या फ्लॅट पार्टनर आहे. रिया चक्रवर्ती जोवर सुशांतच्या घरात होती तोवर ती इन्स्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. विशेष म्हणजे या फोटो आणि व्हिडीओने रियाने क्रेडिट सिद्धार्थला दिले आहे. 

याआधी सुशांतचा मित्र सॅम्युअलने इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन दरम्यान रिया आणि सिद्धार्थबाबत चर्चा केली होती. सॅम्युअलला लाईव्ह सेशन दरम्यान विचारण्यात आले की, सिद्धार्थ पिठानी हा रिया चक्रवर्तीचा चांगला मित्र आहे ?, यावर तो म्हणाला, तो माझ्यापेक्षा जास्त रियाचा चांगला मित्र आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तो रियाचा जवळचा मित्र आहे. 

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, ही मैत्रिण रिया व सुशांत दोघांच्याही जवळची होती. तिने सांगितले की, सुशांतचे संपूर्ण करिअर आणि त्याचा सगळा आर्थिक व्यवहार रिया पाहायची. रियाचे केवळ त्याच्या पैशांवरच कंट्रोल नव्हते तर आपल्या शॉपिंगवरही ती सुशांतचा पैसा उधळायची.

सुशांतच्या मनात निर्माण केला भूत-प्रेतांची भीती सुशांतच्या या मैत्रिणीचा दाव्यानुसार, रिया सुशांतच्या मनात भूत-प्रेतांची भीती निर्माण करायची. मी असे करण्यापासून तिला रोखले असता तिने मला घरात येण्यास मनाई केली. सुशांतची तब्येत बिघडली होती, तेव्हा रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती हेच सुशांतसाठी औषधे आणायचे. सुशांत व रिया या दोघांत काहीत विचित्र होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती