Join us  

कुटुंबात १९ लोक होते पण तरीही राखी गुलजार यांनी स्वतःला कोंडून घेतले होते, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 6:20 PM

नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. एका मुलाखतीत राखी यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्याबद्दलचे खुलासे केले होते.

'करण अर्जुन' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला हा सिनेमा. हा सिनेमा ९०च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमातला मेरे करण- अर्जुन आएंगे…., हा डॉयलॉग प्रचंड हिट ठरला. हा डॉयलॉग आजही तितकाच फेमस आहे. मेरे करन अर्जुन आयेंग  असं म्हटलं की राखी यांचाच चेहरा सर्वांसमोर येतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून राखी या चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत.

 

इतकेच नाही त्यांच्याबाबतीत फार कमी माहिती समोर येते.चंदेरी दुनियेच्या झगमागाटापासून दूर जात सर्वसाधारण आयुष्य त्या आज जगत आहेत. इतकेच काय तर मुंबईही त्यांना नकोशी झाली होती, मायानगरीचा कंटाळा आला होता म्हणून पनवेलच्या फार्महाऊसमध्ये त्या स्थायिक झाल्या. तिथेच शेती करण्यात त्या बिझी झाल्या. 

सिनेसृष्टीत जिकते राखी यशस्वी ठरल्या  तितक्याच खासगी आयुष्यात अपयशी ठरल्या.  गुलजार यांनी अभिनेत्री राखीसोबत 15 मे 1973 रोजी दुसरे लग्न केले होते. गीतकार गुलजार यांच्याशी लग्नबंधनात अडकल्यानंतर राखीच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. लग्नानंतर राखी यांनी सिनेमात काम करु नये असे गुलजार यांची इच्छा होती. मात्र राखी यांना गुलजार यांची ही अट मान्य नव्हती. त्यांनी अनेकवेळा गुलजार यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुलजार यांनी राखीला एकदाही समजून घेतले नाही.

 

अखेर मुलीच्या जन्मानंतर राखी यांना गुलजार यांच्या हट्टामुळे अभियातून दूर जावे लागले. या निर्णयाचा सर्वात जास्त त्रास राखी यांनाच सहन करावा लागला. अखेर त्यांनी गुलजार यांच्यापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला. नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. 

एका मुलाखतीत राखी यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्याबद्दलचे खुलासे केले होते. यात त्यांनी म्हटले होते की, लग्नानंतर आयुष्य फार बदलले होते, एकांतात जगणंत मला जास्त आवडू लागले होते. माझ्या कुटुंबात १९ लोक होते पण मी स्वतःला घरत आयसोलेट करून घ्यायची. जवळच्या मित्रांबरोबर वेळ घालवण्याच्या वेळेत मी मी व्ही. शांताराम, सोहराब मोदी, महबूब खान आणि के.आसिफ यांचे चित्रपट पाहाण्यात वेळ घालवणे जास्त पसंत केले.  गुलजार यांच्यात झालेल्या मतभेदांमुळेच भलेही आज एकत्र राहत नसलो तरीही मैत्री मात्र कायम आहे.

टॅग्स :राखीगुलजार