Join us

​जेव्हा ‘रईस’ भेटतो ‘सुलतान’ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 07:24 IST

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला कळविले होते की , सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाचा टिजर शाहरुखच्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारया ‘फॅन’सोबत ...

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला कळविले होते की, सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाचा टिजर शाहरुखच्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारया ‘फॅन’सोबत दाखविण्यात येणार आहे.इंडस्ट्रीमध्ये अनेक जणांचे कान टवकारले गेले. हे कसं शक्य आहे? असे देखील काही जण म्हणाले. आणि आता तर आणखीच आश्चर्यकारक माहिती समोर येतेय.आपापल्या कामात अतिव्यस्त असलेले दोन्ही सुपरस्टार्स एकमेकांना भेटण्यासाठी किती आतूर आहेत नुकतीच याची प्रचीती आली. शाहरुख ‘रईस’ची शूटिंग करत असताना वेळ काढून ‘सुलतान’च्या सेटवर जाऊन सलमानची भेट घेतली.या ‘सरप्राईज’ भेटीमध्ये दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे वृत्त आहे.  मग आता ही नव्या पर्वाची सुरुवात मानायची का?}}}}