Join us  

पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा बासूला खावा लागला होता करिना कपूरचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 3:41 PM

‘अजनबी’ या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता.

ठळक मुद्देचित्रपटात करिना आणि बिपाशा बासू या दोघींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र करिनाच्या तुलनेत बिपाशाला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. चित्रपटात बिपाशाने जोरदार अंगप्रदर्शन केल्याने तिची जाम चर्चा होती. नेमकी हीच बाब करिनाला खटकली.

फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे एकमेकांसोबत पटत नाही. काही कलाकार एकमेकांशी अजिबातच संवाद साधत नाहीत. काही कलाकारांची इतकी भांडणं होतात की, मीडियामध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगते. 

बिपाशा बासूने 2001 मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात बिपाशासह करिना कपूर लीड रोलमध्ये होती. पण या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता.

चित्रपटात करिना आणि बिपाशा बासू या दोघींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र करिनाच्या तुलनेत बिपाशाला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. चित्रपटात बिपाशाने जोरदार अंगप्रदर्शन केल्याने तिची जाम चर्चा होती. नेमकी हीच बाब करिनाला खटकली. प्रसारमाध्यमांमध्ये बिपाशाच्या नावाची चर्चा होती. मात्र बिपाशाची ही प्रसिद्धी करिनाला पचविणे अवघड झाले होते. मग काय, बिपाशाला टोमणा मारण्याची एकही संधी करिना सोडत नव्हती.

अशात करिनाचा डिजाईनर विक्रम फडणवीसने बिपाशाची मदत केली. मग काय करिनाचा पारा आणखीच भडकला. एक दिवस बिपाशानेही करिनाला जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले. तसे तिने धाडसही केले. परंतु यावेळेस करिनाच बिपाशावर भारी पडली. करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिनाचा राग बॉबीवरही बरसला. त्यालाही तिने सुनावले.

बिपाशा एका मुलाखतीत यावर बोलली होती. करिनाचे वागणे बालिश होते. मी पुन्हा कधीही तिच्यासोबत काम करणार नाही, असे बिपाशाने सांगितले होते. यानंतर करिनानेही याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. तिने सांगितले होते की, माझ्या मते, बिपाशाला तिच्या टॅलेंटवर अजिबात विश्वास नाही. चार पानांच्या मुलाखतीत तीन पेज ती फक्त माझ्यावर बोलली. बिपाशाला जी काही प्रसिद्धी मिळाली ती तिच्या व माझ्या भांडणामुळे मिळाली.

टॅग्स :करिना कपूरबिपाशा बासू