Join us  

अजय देवगणआधी याच्यासोबत होते काजोलचे अफेअर, अजयकडूनच घ्यायची रिलेशनशिप टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:54 AM

काजोल आणि अजय देवगण यांची ओळख झाली त्यावेळी काजोलच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी होते आणि त्यांच्या नात्याविषयी ती अजयकडून अनेकवेळा मार्गदर्शन देखील घेत असे.

ठळक मुद्देपहिल्यांदा जेव्हा अजय देवगणने काजोलला बघितले होते, तेव्हा त्याला ती अजिबातच पसंत आली नव्हती. होय, जेव्हा या दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अजयने काजोलला बघून न बघितल्यासारखे केले.

काजोल आणि अजय देवगणची जोडी चाहत्यांची आवडती आहे. दोघेही सुखाने संसार करत आहेत. त्यांच्या लग्नाला आज 22 वर्षे झाली आहेत. 

काजोल एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने लग्न केल्यानंतर चित्रपटांत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. काजोल आणि अजय यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहेत. काजोल आणि अजय हे दोघे विरुद्ध स्वभावाचे असल्याने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हा सगळ्यांनाच नेहमी प्रश्न सतावतो. काजोल आणि अजय देवगण हे एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. पहिल्यांदा जेव्हा अजय देवगणने काजोलला बघितले होते, तेव्हा त्याला ती अजिबातच पसंत आली नव्हती. होय, जेव्हा या दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अजयने काजोलला बघून न बघितल्यासारखे केले. अजयला सुरुवातीपासूनच असे वाटत होते की, काजोल आणि त्याच्यात कधीच जमणार नाही. कारण दोघांच्या विचारात प्रचंड मतभेद होते. परंतु आज हे दोघे एकत्र असून सुखाने संसार करत आहेत.

एका मुलाखतीत अजयने सांगितले होते की, जेव्हा मी पहिल्यांदा काजोलला भेटलो तेव्हा पुन्हा हिला भेटावे असे मला अजिबातच वाटले नव्हते. कारण मला काजोल अजिबातच आवडली नव्हती. त्यावेळी मला ती खूपच लाऊड, गर्विष्ठ आणि वायफळ बोलणारी वाटायची. अजयचे काजोलबाबत असे मत होते तर काजोल त्या वेळात दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडालेली होती. 

तुम्हाला माहीत आहे का, काजोल आणि अजय देवगण यांची ओळख झाली त्यावेळी काजोलच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी होते आणि त्यांच्या नात्याविषयी ती अजयकडून अनेकवेळा मार्गदर्शन देखील घेत असे. काजोलनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. तिने म्हटले होते की, मी त्यावेळी दुसऱ्या कोणाच्यातरी प्रेमात होते. आमच्या नात्याविषयी मी अजयला अनेकवेळा सांगत असे आणि तो मला त्यावेळी नाते टिकवून ठेवण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन देखील देत असे. पण हे सगळे सुरू असताना मी अजयच्या प्रेमात कधी पडले हे मला देखील कळले नाही. 

अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी कार्तिक मेहता या काजोलच्या मित्रासोबत तिचे अनेक वर्षं अफेअर सुरू होते. त्यामुळे अजयसोबत काजोल लग्न करतेय हे कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

टॅग्स :काजोलअजय देवगण