Join us  

सेलिब्रिटींचे 'शेजारी' का म्हणतायेत तुमचा खेळ होतो,आमचा जीव जातो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2017 9:47 AM

अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजा-यांनी मुंबई महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. घराचे इलेक्ट्रिक जंक्शन अर्थात मीटर बॉक्स बेकायदेशीररित्या फ्लोरच्या पॅसेज ...

अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजा-यांनी मुंबई महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. घराचे इलेक्ट्रिक जंक्शन अर्थात मीटर बॉक्स बेकायदेशीररित्या फ्लोरच्या पॅसेज एरियामध्ये बनवलं आहे. याविरोधात सोसायटीच्या रहिवाशांनी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप अनुष्कावर करण्यात आलाय. मात्र अशाप्रकारे राहत्या सोसायटीमधील नागरिकांशी आणि शेजा-यांशी वाद झालेली अनुष्का ही काही पहिली सेलिब्रिटी नाही. याआधीही अनेक कलाकार शेजा-यांशी झालेल्या वादामुळे अडचणीत आले आहेत. पाहूया कोण आहेत हे सेलिब्रिटी आणि काय होता त्यांचा शेजा-यांशी वाद. शक्ती कपूरबॉलिवूडचा  क्राईम मास्टर गो-गो म्हणजेच शक्ती कपूर. सिनेमात नायिका आणि नायकांना त्रास देणारा शक्ती कपूर रियल लाइफमध्ये शेजा-यांसाठीही त्रासदायक ठरला. लिफ्टमध्ये जाण्या-येण्यावरुन शक्ती कपूर आणि तो राहत असलेल्या सोसायटीतील नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. इतकंच नाही तर शक्ती कपूर बिल्डिंगच्या कॉरिडोअरमध्ये अर्धनग्न अवस्थेत वावरत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली होती. मात्र काही वर्षानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशी घटना घडल्याचे शक्ती कपूरने मान्य केले. आता आपले आपल्या सोसायटीमधील नागरिकांशी चांगले  संबंध असल्याचेही त्याने स्पष्ट केले. शाहिद कपूरशाहिद कपूरच्या जुहू इथल्या बंगल्यावर काही महिन्यांपूर्वी नुतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. या कामा दरम्यान बांधकाम करणा-या मजुरांनी भिंती खराब केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले होते. या शाहिदच्या सोसायटीतल्या रहिवाशांनी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. शाहरुख खानव्हॅनिटी व्हॅन उभ्या करण्यासाठी मन्नत या बंगल्याबाहेर बेकायदेशीररित्या रॅम्प बांधल्याप्रकरणी अभिनेता  किंग खान शाहरुख वादात सापडला होता. या अनधिकृत रॅम्पमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे स्थानिकांनी या रॅम्पविरोधात आवाज उचलत आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत मुंबई महापालिकेने 2015 मध्ये या अनधिकृत रॅम्पवर हातोडा चालवला. सलमान खानअभिनेता सलमान खानच्या दंबगगिरीचा फटका त्याच्या शेजा-यांना सोसावा लागला. आपल्या बंगल्यासमोर व्हॅनिटी व्हॅन पार्क केल्याने शेजा-यांना त्रास होत होता. त्यामुळे सलमानच्या शेजा-यांनी याविरोधात आवाज उचलला आणि तक्रार दाखल केली. परिणामी सलमानला 2010 साली बाराशे रुपये दंडही भरावा लागला होता. करीना कपूर-खानबेगम करीना कपूर खान हिनं की एंड का सिनेमाच्या यशानिमित्त आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरु होती. रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश म्युझिकच्या तालावर ही पार्टी रंगली होती. या आवाजामुळे करीनाच्या शेजा-यांना त्रास सहन करावा लागला. त्यांनी याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेऊन पोलीस तिथं दाखल झाले आणि त्यांनी ही कर्णकर्कश पार्टी थांबवली. आदित्य पांचोलीअभिनेता आदित्य पांचोली याचेही त्याच्या शेजा-यांशी चांगले संबंध राहिले नाहीत. आदित्य पांचोलीच्या घराच्या नुतनीकरणाचं काम सुरु होतं.यावरुनच आदित्य पांचोली आणि त्याच्या शेजा-यांमध्ये जोरदार वादावादीही झाली. यावेळी आदित्य पांचोलीने त्याच्या शेजा-यांना धमकावल्याचा आरोप झाला.याप्रकरणी आदित्य पांचोलीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.