श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी का होतोय विलंब, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 17:04 IST
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी दुबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. आपल्या पुतण्याच्या ...
श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी का होतोय विलंब, जाणून घ्या!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी दुबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी श्रीदेवी परिवारासोबत दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण देशात दु:ख व्यक्त केले जात आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून एअर कार्गोने मुंबईत आणले जाणार आहे. मात्र दुबईहून पार्थिव मुंबईत आणण्यासाठी कपूर परिवाराला एका प्रक्रियेचा सामना करावा लागत आहे. कारण पार्थिव मिळविण्यासाठी दुबईमध्ये बºयाचशा नियमांची पूर्तता करावी लागत आहे. १) दुबईहून पार्थिव आणण्यासाठी सुरूवातीला रुग्णालय, आरोग्य मंत्रालय आणि पोलिसांशी संबंधित फॉर्मेलिटीज पूर्ण करावी लगाते. हे काम त्याठिकाणी रविवार ते गुरुवात यादरम्यान सुरु असते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकाळी ८ ते दुपरी २ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. २) वास्तविक आॅफिस टायमिंग संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी फोनच्या माध्यमातून संबंधित अधिकाºयांची मदत घेता येवू शकते. ३) मृत्यूसंबंधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉन्सुलेट अधिकाºयाकडून २४ तास मदत घेता येऊ शकते. आॅफिस टायमिंगनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी ०५०-७३४७६७६ या क्रमांकावर फोनच्या माध्यमातून मदत मिळविता येते. ४) दुबईमध्ये हादेखील नियम आहे की, जर मृत्यू घर किंवा हॉस्पिटल व्यतिरिक्त अन्य ठिकाणी होतो तेव्हा पार्थिव शरिर अधिक चौकशीसाठी पोलीस मॉर्चुरी येथे घेऊन जातात. ५) मृत्यू प्रमाणपत्र पोलीस सर्जनकडूनच घेणे आवश्यक असते. ६) जर मृत्यू हॉस्पिटल किंवा अॅम्बुलेंसमध्ये होतो तेव्हा मृत्यूप्रमाणपत्र हॉस्पिटल अधिकाºयांकडून घ्यावे लागते.