असे काय झाले की, पुन्हा सुरू झाल्यात अमिताभ बच्चन यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:44 IST
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. पण आता बिग बी पुन्हा एकदा राजकारणात अॅक्टिव्ह होणार, अशी ...
असे काय झाले की, पुन्हा सुरू झाल्यात अमिताभ बच्चन यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. पण आता बिग बी पुन्हा एकदा राजकारणात अॅक्टिव्ह होणार, अशी चर्चा आहे. चर्चा केवळ इतकीच नाही तर अमिताभ पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, इथपर्यंत चर्चेचे पेव फुटले आहे. अर्थात याला कारणही तसेच आहे. होय, अलीकडे अमिताभ यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना फॉलो करणे सुरू केले आहे. त्यामुळे अचानक अमिताभ यांच्या राजकीय पुनर्प्रवेशाचा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. अमिताभ यांनी आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला फॉलो केले. मग पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, अशोक गहलोत, अजय माकन, सचिन पायलट, सीपी जोशी यांनाही या महिनाभरात फॉलो करणे सुरु केले. अलीकडे त्यांनी मनीष तिवारी, शकील अहमद, संजय निरूपम, रणदीप सुरजेवाला, संजय झा या नेत्यांनाही फॉलो करणे सुरू केले. अमिताभ यांनी काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांना फॉलो केल्यावर त्यांनी बिग बींचे आभारही मानलेत. आता या फॉलो करण्यामागे अमिताभ यांची स्वत:ची काही राजकीय समीकरणे आहेत की आणखी काही, हे आम्हाला ठाऊक नाही. पण चर्चांना बाजार गरम आहे, एवढे मात्र नक्की.ALSO READ : अमिताभ बच्चन यांना हवे काम!! दीपिका, कॅटरिनाकडे केला अर्ज!! खरे तर याआधी अमिताभ यांनी राजकीय आखाड्यात हात आजमावून पाहिला होता. पण राजकारण प्रवेश ही अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. स्वत: अमिताभ बच्चन यांनीही अनेकदा हे मान्य केले आहे. अमिताभ हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर राजकारणात आले होते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी विरोधी नेत्यांच्या विरोधात उभे करण्यासाठी तगडे उमेदवार हवे होते. अलाहाबाद येथून हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अमिताभ बच्चन यांना उत्तरावण्यात आले. अमिताभ यांनी प्रचंड मतांनी बहुगुणा यांच्यावर विजय मिळवला. पण सिनेमातील करिअरकडे त्यांचे जास्त लक्ष असल्याने विरोधक याचा फायदा उचलू लागले. त्यादरम्यान त्यांचे बरेच हिट सिनेमे येऊन गेले. राजकारणापासून दूर जात असलेल्या अमिताभ यांच्या या गोष्टीचा फायदा घेत विरोधकांनी त्यांचे नाव बोफोर्स, फेअरफेक्स घोटाळ्यात गोवले. याच दबावात त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.