Join us  

​काय म्हणता? उदय चोप्राच्या घरी शिफ्ट झाली नर्गिस फखरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 4:37 AM

बॉलिवूड गॉसिप्सच्या जगातील सध्याची सर्वात मोठी बातमी आहे. होय, अभिनेत्री नर्गिस फखरी आणि उदय चोप्राच्या अफेअरच्या चर्चांनी पुन्हा डोके ...

बॉलिवूड गॉसिप्सच्या जगातील सध्याची सर्वात मोठी बातमी आहे. होय, अभिनेत्री नर्गिस फखरी आणि उदय चोप्राच्या अफेअरच्या चर्चांनी पुन्हा डोके वर काढले आहे. याच अफेअरच्या चर्चेदरम्यान एक अपडेट आहे. ते म्हणजे, नर्गिस फखरी तिचा कथित बॉयफ्रेन्ड उदय चोप्राच्या घरी शिफ्ट झाली आहे.सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट करणारे उदय व नर्गिस यांचे गतवर्षी ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचीही चर्चा होती. उदयसोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्याही होत्या. अर्थात नर्गिसने  या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले होते. उदयने तर यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. नर्गिस व मी केवळ जवळचे मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाला रिलेशनशिपचे नाव देऊन मोकळा झालाय. पण यात काहीही सत्य नाही, असे त्याने म्हटले होते.   या खुलाशानंतर उदय व नर्गिस कधीच एकत्र दिसले नाही.  मात्र  यावर्षी एप्रिल महिन्यात सुमारे वर्षभरानंतर   हे दोघे पहिल्यांदा एकत्र विमानतळावर दिसले होते. पुढे तर या दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केल्याची अफवा पसरली होती. अर्थात नेहमीप्रमाणे नर्गिसने  सोशल मीडियावरून याचे खंडन केले होते. पण ताजी बातमी खरी मानाल तर, नर्गिस मुंबईत यश चोप्रा यांच्या बंगल्यात उदय व त्याची आई पामेला यांच्यासोबत राहू लागली आहे. या बातमीनंतर पुन्हा एकदा उदय व नर्गिस या दोघांनी लग्न केल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.ALSO READ : रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता? आता खरे काय नि खोटे काय, हे नर्गिस व उदयलाच ठाऊक. पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती.