Join us  

इमरान हाशमीने त्याच्या पाळीव कुत्र्याला केले होते किस, वाचा काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 1:53 PM

एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देण्यावरून बॉलिवूडमध्ये सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाशमीबाबत एक मजेशीर किस्सा तुम्हाला ...

एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देण्यावरून बॉलिवूडमध्ये सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाशमीबाबत एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक इमरानने कित्येक सुंदर अभिनेत्रींसोबत किस सीन दिले, परंतु त्याला त्यांच्यात फारसा आनंद मिळाला नसावा. त्यामुळेच तो पाळीव कुत्र्यासोबत केलेला किस सर्वात चांगला किस असल्याचे सांगतो. हे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल, पण हा खुलासा स्वत: इमरानने केला आहे. इमरानने या अजब किसचा अनुभव तेव्हा कथन केला जेव्हा तो कलर्स टीव्हीवरील ‘फराह की दावत’ या शोमध्ये पोहोचला होता. त्याने शोचे होस्ट फराह खानला सांगितले की, ‘मला स्ट्रॉबेरीची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे मी किस सीन करताना स्ट्रॉबेरी खाणे टाळतो. वास्तविक किस सीन देताना मला खूप तयारी करावी लागते. या तयारीतील महत्त्वाचा भाग म्हणजे स्ट्रॉबेरीपासून दूर राहणे. शिवाय मी ही बाब दिग्दर्शकांनादेखील अगोदरच स्पष्ट करतो की, किस सीनमध्ये स्ट्रॉबेरीचा कुठलाही वापर केला जाऊ नये. तसेच अपोझिट असलेल्या अभिनेत्रीलाही स्ट्रॉबेरी खाऊ देऊ नये.’पुढे बोलताना इमरानने म्हटले की, हा सर्व किस्सा चित्रपटात किस सीन देतानाचा आहे. मी जेवढे किस सीन दिले तेव्हा स्ट्रॉबेरीपासून दूर राहिलो. परंतु अशातही हे माझे सर्वोत्कृष्ट किस सीन नाहीत, तर इमरानने चेष्टा मस्करीत बोलताना सांगितले की, माझा सर्वात फेव्हरेट किस माझ्या पाळीव कुत्र्यासोबतचा आहे. जेव्हा माझा पाळीव कुत्रा माझे तोंड चाटत होता, तो माझा सर्वात चांगला किस होता. अर्थात इमरानने हे सर्व चेष्टामस्करीत म्हटले.