Watch Video : सलमान खान त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसोबत झाला स्पॉट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 16:27 IST
सलमान आणि त्याची गर्लफ्रेण्ड यूलिया वेंटर हिला उदयपूर येथे एकत्र बघण्यात आले आहे. त्यामुळे हे दोघे अजूनही एकमेकांसोबतच आहेत, हे आता सिद्ध झाले आहे.
Watch Video : सलमान खान त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसोबत झाला स्पॉट!!
काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, अभिनेता सलमान खान आणि त्याची सो-कॉल्ड गर्लफ्रेण्ड यूलिया वेंटर यांच्यात जोरदार भांडण झाले असून, आता हे दोघे एकमेकांचा चेहरा बघणेही पसंत करीत नाहीत. मात्र ही बातमी पूर्णत: अफवा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. कारण सलमान आणि त्याची गर्लफ्रेण्ड यूलिया वेंटर हिला उदयपूर येथे एकत्र बघण्यात आले आहे. त्यामुळे हे दोघे अजूनही एकमेकांसोबतच आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. वास्तविक हे पहिल्यांदाच नाही की, सलमान गर्लफ्रेण्ड युलियासोबत एकत्र स्पॉट झाला. यापूर्वीदेखील जेव्हा सलमान अन् त्याचा परिवार मालदीव येथे भाचा अहिलच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी पोहोचला होता. त्यावेळीही युलिया सलमानसोबत क्वालिटी टाइम व्यतित करताना बघावयास मिळाली. यावेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये सलमान आणि युलिया एकमेकांजवळ बसलेले दिसत होते. त्याचदरम्यान दोघांचे काही फोटोही इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. सलमान, उदयपूर येथे एका लग्नसमारंभासाठी गेला होता. नेपाळचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती बिनोद चौधरी यांचा मुलगा वरुण चौधरी याच्या विवाहासाठी सलमान गर्लफ्रेण्डसोबत पोहोचला होता. याठिकाणी सलमान मुख्य अतिथी म्हणून आल्याने सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे होत्या. ब्लॅक कलरचे जॅकेट परिधान केलेल्या सलमानकडे लग्नातील सर्वच मंडळी निरखून बघत होती. यावेळी तो त्याच्या बॉडीगार्डसह वेन्यू येथे पोहोचला अन् नवदाम्पत्यांचे अभिनंदन केले. काही वेळानंतरच तो तेथून निघाला. रोमानियन मॉडेल म्हणून युलिया वेंटर हिला ओळखले जाते. युलिया मॉडेलबरोबरच टीव्ही होस्ट असून, २००६ पासून ती टीव्ही जगताकडे वळाली. तिने बरेचसे मॉर्निंग न्यूज शो होस्ट केले आहेत. सलमानने अद्यापपर्यंत जरी युलियासोबतचे नाते जाहीरपणे स्वीकारले नसले तरी, दोघांमध्ये काहीतरी गुप्तगु असल्याचे कोणीच नाकारू शकत नाही. शिवाय युलिया सलमानच्या परिवारातही चांगलीच मिसळली असल्याने दोघांमधील नाते सहजासहजी तुटेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही.