Join us  

Watch Video: अचानक तुटून पडली गर्दी; मौनी रॉयची उडाली घाबरगुंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:26 AM

होय, मौनी थिएटरमधून बाहेर पडली आणि चाहत्यांनी तिला असे काही घेरले की, या गर्दीला कसे थोपवावे, हेच मौनी कळेनासे झाले. 

मौनी रॉय तशीही लोकप्रीय होतीच़ छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रीय अभिनेत्री म्हणूनचे मौनीला ओळखले जाते. पण ‘गोल्ड’ या १०० कोटी क्लबच्या चित्रपटानंतर मौनी रॉयची लोकप्रीयता आणखीचं वाढली आहे. होय, मौनीचा स्टाईलिश अंदाज, तिची फॅशनची समज आणि तिचा अभिनय सगळेच हटके आहे आणि म्हणून चाहत्यांमध्ये मौनीची क्रेज वाढते आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही या बातमीसोबतचा व्हिडिओ पाहायलाचं हवा. होय, मौनी थिएटरमधून बाहेर पडली आणि चाहत्यांनी तिला असे काही घेरले की, या गर्दीला कसे थोपवावे, हेच मौनी कळेनासे झाले. कुठलीही सुरक्षा नसल्याने मौनी अस्वस्थ झाली.

यादरम्यान मौनीची बेस्ट फे्रन्ड ईशा गुप्ता हिने मोर्चा सांभाळला आणि गर्दीला कसेबसे थोपवून धरले. यानंतर एका मित्राच्या मदतीने मौनीने गर्दीतून सुटका करून घेतली. एकंदर काय तर अन्य बॉलिवूड स्टारप्रमाणे मौनीही गर्दी खेचू लागली आहे. अशास्थितीत सुरक्षा रक्षकांची फौज बाळगायला तिला हरकत नाही. गत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्ताला मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मधून तिचा डेब्यू झाला. या चित्रपटात मौनीने अक्षय कुमारची पत्नी मोनोबिनाची भूमिका साकारली आणि तिची ही भूमिका पे्रक्षकांनाही भावली. मौनीचा यापेक्षा उत्तम बॉलिवूड डेब्यू होऊच शकला नसता, असे  या चित्रपटानंतर मानले जात आहे. यापुढे छोट्या पडद्यावर काम करायचे नाही, असा निर्णय तिने घेतल्याचेही कळतेय.  ‘गोल्ड’ रिलीज होण्यापूर्वीच मौनीने चार चित्रपटही साईनकेले आहेत. ‘गोल्ड’च्या प्रमोशनवेळी खुद्द अक्षय कुमारने ही माहिती दिली होती. यापैकी एक आहे, ‘ब्रह्मास्त्र’ आणि दुसरा आहे जॉन अब्राहमचा ‘रॉ’. या दोन्ही चित्रपटात मौनी अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. अन्य दोन सिनेमे कोणते आहेत, ते मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

टॅग्स :मौनी राॅय