Join us  

Video: शर्लिन तुने क्या किया सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 4:50 PM

सोशल मीडियावरही हा व्हिडीओ खूप ट्रेंड होत असून आत्तापर्यंत 132,136 अधिक व्हयुज या व्हिडीओला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलीवुडमध्ये काहीजण प्रसिद्धीसाठी इतके काही आसुसलेले असतात की त्यांना कशाचंही भान राहत नाही... मात्र अति केलं तिथं माती तर होणारच नाही का... अशीच काहीशी अवस्था झालीय हॉट बेब शर्लिन चोपडाची..त्यामुळं.शर्लिन तुने क्या किया असं तिचे फॅन्स म्हणतायत....नुकताच नेपाळ येथील एका कार्यक्रमात शर्लिन ''मेरे रश्के कमर'' या गाण्यावर थिरकताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शर्लिन म्हटल्यावर कार्यक्रमाला चार चाँद लागले होते. तिचा डान्स तिथे सारेच एन्जॉय करत होते. या व्हिडीओत तिच्या डान्सिंग मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकल्याचे पाहायला मिळत आहेत.इतकेच नाहीतर सोशल मीडियावरही हा व्हिडीओ खूप ट्रेंड होत असून आत्तापर्यंत  132,136 अधिक व्हयुज या व्हिडीओला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.खुद्द शर्लिनेच तिचा हान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्लेबॉयच्या फ्रंटपेजवर न्यूड फोटो देऊन त्याचं ट्विट करुन शर्लिननं एकच धूमाकूळ घातला होता... मात्र स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करणंच शर्लिनला कामसूत्र थ्रीडी सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी कारणीभूत ठरला होता.त्यानंतर रुपेरी पडद्यावर येण्याचं स्वप्न शर्लिननं थोडा वेळ बाजूला करत मॅगझिन कव्हरपेज आणि युट्युबवरील व्हिडीओमध्ये बिझी झाली होती. आपले हॉट फोटो आणि व्हिडीओजमुळेच ती जास्त चर्चेत असायची.त्यानंतर तिने आपला मोर्चा छोटा पडदाकडे वळवला होता. 'स्लिटसव्हिला' या शोची ती होस्ट होती. तसेच 'बिग बॉस 3' मध्येही शर्लिन चोप्रा झळकली होती.   

सिनेमा असो किंवा आणखी कोणते माध्यम तिथे मनोरंजनावेळी अंगप्रदर्शन करण्यात काही वावगे नसून ती ही एक कला असल्याचे तिचे मत ती वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये ठामपणे मांडत असते. सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नसल्याचेही तिचे म्हणणे आहे.