Join us  

Watch Video : अनेक महिन्यांनंतर दिसला इरफान खानचा चेहरा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 10:34 AM

कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खान याच्या वापसीकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. याच चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये इरफानचा ‘इंग्लिश मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या चित्रपटाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चर्याला धक्का दिला होता.

कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खान याच्या वापसीकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. याच चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. होय, इरफान  खान लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर परतेल, ही आशा पल्लवित करणारे त्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो मुंबई विमानतळावरचे आहेत.  इरफान विमानतळाबाहेर पडतोय. यावेळी त्याच्या चेह-यावर स्कार्फ आहे. पण मीडियाचे फोटोग्राफर्सला पाहून इरफानने चेह-यावरचा स्कार्फ हटवला आणि अनेक महिन्यांंनंतर त्याचा चेहरा पाहता आला.

लवकरच इरफान ‘इंग्लिश मीडियम 2’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात करिना कपूर पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे. पुढील महिन्यांत लंडनमध्ये इरफान ‘इंग्लिश मीडियम 2’च्या टीमला ज्वॉईन करणार आहे. 

२०१७ मध्ये इरफानचा ‘इंग्लिश मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या चित्रपटाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चर्याला धक्का दिला होता. चीनमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती. पण याचदरम्यान इरफानला न्युरोएंडोक्राईन ट्युमर कॅन्सरचे निदान झाले होते. यावरच्या उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला होता. पण आता इरफान भारतात परतला आहे आणि आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी तयार आहे.

टॅग्स :इरफान खान