Watch Video : बापरे... श्रद्धा कपूरच्या मागे लागले दीड कोटींपेक्षा अधिक लोक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 18:08 IST
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मागे सध्या दीड कोटींपेक्षा अधिक लोक लागले आहेत.
Watch Video : बापरे... श्रद्धा कपूरच्या मागे लागले दीड कोटींपेक्षा अधिक लोक!!
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मागे सध्या दीड कोटींपेक्षा अधिक लोक लागले आहेत. हे लोक असे आहेत की, तिचा पिच्छा सोडण्यास तयार नाहीत. आता तुम्ही म्हणाल असे ते कोणते लोक असावेत जे श्रद्धाच्या मागे लागले आहेत, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे लोक दुसरे तिसरे कोणीही नसून, तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. श्रद्धासाठी ही एक आनंदाची बाब असून, तिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता ही संख्या १५ मिलियन म्हणजेच दीड कोटींच्यावर पोहोचली आहे. यामुळे श्रद्धादेखील खूश असून, आपल्या फॉलोअर्स फॅन्सचे आभार मानण्यासाठी तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे टीममेट्स हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी केक कटिंग सेरिमनीचे आयोजन करतात. मात्र ही बाब श्रद्धाला अजिबात माहिती नसते. ती जेव्हा त्या रुममध्ये येते तेव्हा केक बघून हरकून जाते. श्रद्धाने हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्यांनी मला सरप्राइज दिले. माझी टीम खूप-खूप चांगली आहे. मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करते. १.५ कोटी फॉलोअर्सचे आभार.’ श्रद्धा सध्या तिच्या आगामी ‘हसिना’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अनेक रूपांमध्ये बघावयास मिळणार आहे. ‘द क्वीन आॅफ मुंबई’च्या माध्यमातून ती पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला पडद्यावर जीवंत करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ज्यामध्ये श्रद्धा हसिनाच्या अवतारात खूपच डॅशिंग दिसत होती. वयानुसार प्रत्येक वळणावर वेगळे दिसण्यासाठी श्रद्धाने तिच्या लुक्सवर प्रचंड एक्सपेरिमेंट केल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १४ जुलै २०१७ रोजी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त श्रद्धा लवकरच अर्जुन कपूरबरोबर ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रोमो आणि पोस्टर्सनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही या चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.