WATCH : ‘अ जेंटलमॅन’च्या ‘बंदूक मेरी लैला’ गाण्याची ‘हॉट’ झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:51 IST
सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिसचा ‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट रिलीजआधीच चर्चेत आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला आहेच. आता वेळ आहे ती, चित्रपटातील बहुप्रतीक्षीत गाणे ‘बंदूक मेरी लैला’च्या टीजरची.
WATCH : ‘अ जेंटलमॅन’च्या ‘बंदूक मेरी लैला’ गाण्याची ‘हॉट’ झलक!
सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिसचा ‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट रिलीजआधीच चर्चेत आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला आहेच. आता वेळ आहे ती, चित्रपटातील बहुप्रतीक्षीत गाणे ‘बंदूक मेरी लैला’च्या टीजरची. होय, ‘बंदूक मेरी लैला’ या गाण्याचा टीजर काही क्षणांपूर्वीच रिलीज करण्यात आला. या टीजरबद्दल जितके सांगावे तितके कमी आहे. आता टीजरमध्ये असे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही स्वत:च टीजर पाहायला हवा. यात सिद्धार्थ व जॅकलिन दोघेही बंदूकीसोबत खेळताना दिसत आहेत. एकंदर काय तर, हा टीजर हॉटपेक्षा थोडा अधिक हॉट आणि सेक्सीपेक्षा थोडा अधिक सेक्सी आहे,असेच आम्ही म्हणू.९ सेकंदाचा हा टीजर पाहून तुम्ही या गाण्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही. पूर्ण गाणे रिलीज झाल्यानंतर तर हे गाणे तुमच्या ओठांवर असेल, असे आम्ही दाव्यानिशी सांगतोय. या गाण्यात आणखी एक सरप्राईज दिसणार आहे. होय, हेच ते गाणे आहे, ज्यात सिद्धार्थ रॅप करताना दिसणार आहेत. म्हणजेच या गाण्यात आपल्याला रफ्तार व एश किंग यांच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राचा आवाजही ऐकायला मिळणार आहे. अलीकडे ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमध्ये सिद्धार्थचे सुंदर, सुशील आणि धाडसी रूप पाहायला मिळाले होते. या चित्रपटात सिद्धार्थचा डबलरोल आहे. गौरव आणि ऋषी अशी दुहेरी पात्र त्याने रंगवलेली आहेत. तर जॅकलिनने काव्या नामक मुलीची भूमिका साकारली आहे. गौरव अतिशय शालिन मुलगा आहे. त्याच्याकडे सगळे काही आहे. केवळ प्रेमाची कमतरता आहे. अशात काव्या त्याच्या आयुष्यात येते. गौरव काव्यावर अतिशय पे्रम करतो. तिच्याशी लग्न करू इच्छितो. पण काव्याला काहीसा धाडसी मुलगा हवा असतो. गौरवमध्ये सगळे काही चांगले आहे. पण तो जरा जास्तच ‘सेफ’ आहे, असे काव्याला वाटत असते. याचदरम्यान चित्रपटात हुबेहुब गौरवसारख्या दिसणाºया ऋषीची एन्ट्री होते.