Join us  

अखेर प्रतीक्षा संपली! 'द फॅमिली मॅन २' या दिवशी येणार भेटीला, ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:57 AM

द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

मनोज वाजपेयीची लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या भागाला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आता त्याच्या सीक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. राज व डीके यांची निर्मिती असलेली सीरिज द फॅमिली मॅन ४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'द फॅमिली मॅन' उर्फ श्रीकांत तिवारीच्‍या पुनरागमनाचा लक्षवेधक ट्रेलर सादर केला आहे. मनोज वाजपेयी यांनी ही भूमिका साकारली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक दाखवेल.

निर्माते राज व डीके म्‍हणाले,आम्‍हाला विश्‍वास आहे की, महामारीदरम्‍यान काम करावे लागले असले तरी आम्‍ही तुम्‍हा सर्वांसाठी रोमांचक सीझनची निर्मिती केली आहे. आशा करतो की, नवीन सीझन अद्वितीय ठरेल. हा अत्‍यंत अवघड काळ आहे आणि आम्‍ही लवकरच सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्‍यक्‍त करण्‍यासोबत प्रार्थना करतो.  

या सिरीजमधून दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे. या सिरीजमध्‍ये मनोज वाजपेयीसोबत, प्रियामणी, यांच्यासोबत शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. या सोबतच तमिळ चित्रपटसृष्‍टीमधील नावाजलेले मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल देखील असणार आहेत.

टॅग्स :मनोज वाजपेयीसमांथा अक्कीनेनी