अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहली देणार ‘बिग सरप्राईज’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 16:06 IST
उद्या म्हणजे, १ मे रोजी अनुष्का शर्मा तिचा २९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण यंदाचा वाढदिवस अनुष्कासाठी अनेकार्थाने ...
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहली देणार ‘बिग सरप्राईज’!
उद्या म्हणजे, १ मे रोजी अनुष्का शर्मा तिचा २९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण यंदाचा वाढदिवस अनुष्कासाठी अनेकार्थाने खास असणार आहे. होय, अनुष्काचा हा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, यासाठी तिचा कथित बॉयफ्रेन्ड विराट कोहली याने एक भन्नाट बेत आखलाय. आता हा बेत काय, हे तुम्हाला ठाऊक नसेल तर आम्ही सांगतो. होय, अनुष्काच्या २९ वाढदिवशी विराट तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. काही दिवसांपूर्वी विराटचा वाढदिवस झाला होता. विराटला सरप्राईज देण्यासाठी अनुष्का राजकोटला पोहोचली होती. आता कदाचित विराटही अनुष्काला असेच मोठे सरप्राईज देणार आहे.अनुष्का व विराट दोघेही गत तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. पण ही बातमी केवळ अफवाच ठरली. गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का दोघेही कायम चर्चेत आहे. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा फोटा लावला आणि चर्चेचे पेव फुटले होते. या प्रोफाईल फोटोने दोघांमधील रिलेशनशिप उघड झाले होते. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. यापूर्वीही विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्काचा फोटो पोस्ट केला होता. वूमन डेचे औचित्य साधून विराटने अनुष्कासोबतचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला होता.जगातील प्रत्येक महिलेला हॅपी वुमेन्स डे. पण विशेषत: माझ्या आयुष्यातील दोन सर्वाधिक सशक्त महिलांसाठी, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. एकंदर काय तर विराटने अनुष्कासोबतचे नाते अप्रत्यक्ष का होईना मान्य केले आहे. आता उद्या अनुष्काच्या वाढदिवशी काय होते, ते बघूच.