Join us  

अनुष्का शर्मा सोबतच्या पहिल्या भेटीत विराट कोहली झाला होता खूप नर्व्हस, मग घडलं असं काही

By तेजल गावडे | Published: December 26, 2020 6:00 AM

क्रिकेटच्या मैदानावर नेहमी कॉन्फिडंट असणारा विराट कोहली अनुष्का सोबतच्या पहिल्या भेटीत खूप नर्व्हस झाला होता.

क्रिकेट आणि सिनेमाचे फार जुने नाते आहे. कित्येक प्रसिद्ध क्रिकेटर्सनी बॉलिवूडच्या अभिनेत्रींसोबत लग्नबेडीत अडकल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. या जोडीला लोक विरूष्का असे संबोधतात. सध्या अनुष्का शर्मा प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की क्रिकेटच्या मैदानावर नेहमी कॉन्फिडंट असणारा विराट कोहली अनुष्का सोबतच्या पहिल्या भेटीत खूप नर्व्हस झाला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.

एका मुलाखतीत विराटने सांगितले की, मी अनुष्काला पहिल्यांदा एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये भेटलो होतो. हे शूटिंग तीन दिवसांपर्यंत चालू होते. माझ्या मॅनेजरने सांगितले होते की, तुम्हाला ही जाहिरात अनुष्का शर्मासोबत शूट करायची आहे. हे ऐकून मी खूप नर्व्हस झालो होतो. मी म्हटले की ती एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. मी तिच्यासोबत कसा अभिनय करू शकेन. मला मॅनेजरने समजावले की, सर्व ठीक होईल, स्क्रीप्ट मजेशीर आहे. मात्र तरीदेखील मी खूप नर्व्हस होतो.

विराट कोहलीने सांगितले होते की, शूटिंगदरम्यान अनुष्काने हिल्स घातले होते आणि त्यामुळे ती खूप उंच वाटत होती. यावर विराटने तिथे एक जोकदेखील केला. विराटने असे काही म्हटले ते ऐकून अनुष्काला खूप विचित्र वाटले आणि त्यामुळे तो आणखी नर्व्हस झाला.

या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटली मध्ये लग्न केले.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली