खलनायकाची भूमिका आवडली -अक्षय खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 14:58 IST
अक्षय खन्ना हा अगोदर हिरोची भूमिका करत होता. मात्र, आता त्याने अनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. ते ही ...
खलनायकाची भूमिका आवडली -अक्षय खन्ना
अक्षय खन्ना हा अगोदर हिरोची भूमिका करत होता. मात्र, आता त्याने अनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. ते ही ‘ढिशूम’ चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका केली आहे.सुत्रांच्या माहितीनुसार,‘ जेव्हा रोहित अक्षय खन्नाला भेटण्यासाठी गेला तेव्हा रोहितला वाटले की, अक्षयला या भूमिकेसाठी खुप तयार करावे लागेल. पण तसे काहीच झाले नाही. त्याने स्टोरी ऐकली आणि तो लगेचच तयार झाला. त्याने याअगोदर ‘हमराज’ आणि ‘ रेस’ या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. त्याला खलनायकाची भूमिका करायला आवडते. ’