Join us  

और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 5:54 PM

Vijay Deverakonda : सध्या विजय ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनसाठी विजय हैदराबादेत होता. पण या इव्हेंटमध्ये असं काही झालं की विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘लाइगर’  (Liger ) हा सिनेमा येतोय आणि सध्या विजय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनसाठी विजय हैदराबादेत होता. पण या इव्हेंटमध्ये असं काही झालं की विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. होय, एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना प्रश्नांना उत्तर देत असताना विजय देवरकोंडाने आपले पाय टेबलावर ठेवले आणि याचवरून मोठा वाद उभा झाला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विजयवर चौफेर टिका सुरू झाली. आता अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे प्रकरण गेल्या आठवड्यात विजय ‘लाइगर’च्या प्रमोशनसाठी हैदराबादेत होता. यादरम्यान त्याने व त्याची को-स्टार अनन्या पांडे दोघांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आपल्या मनातील गोष्ट शेअर केली होती. ‘तुझा टॅक्सीवाला चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. पण आता ते शक्य नाही,’ असं हा पत्रकार विजयला म्हणाला. यावर विजयने त्याला कम्फर्टेबल वाटावं यासाठी त्याला त्याचे पाय समोरच्या टेबलावर ठेवायला सांगितले आणि यानंतर स्वत:ही टेबलावर पाय ठेवले. चल, आता मोकळेपणानं बोलू, असं विजय त्या पत्रकाराला म्हणाला. यावर सगळेच हसू लागले. पण हे सगळं बाजूला राहिलं आणि केवळ टेबलावर पाय ठेवून बोलतानाचे विजय देवरकोंडाचे फोटो व्हायरल झालेत. मग काय? विजय देवरकोंडा सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागला.विजय देवरकोंडाला अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम आहे. त्याच्या डोक्यात हवा गेलीये, असं काय काय कमेंट्स सुरू झाल्यात.

विजय म्हणाला...

आता विजयने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा एखादा समोर जातो, तेव्हा त्याला लक्ष्य केलं जातं. पण आम्ही लढत राहू... तुम्ही स्वत: प्रामाणिक असाल तर तुम्ही सगळ्यांचं भल व्हावं असा विचार करता. अशावेळी देव आणि लोकांचं प्रेम तुमचं रक्षण करतो, असं ट्विट विजयने केलं आहे.

विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा येत्या 25 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटात विजयच्या अपोझिट अनन्या पांडे आहे. यात विजय देवरकोंडा एका बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणर आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडाअनन्या पांडे