Join us

इंदिरा गांधी यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार विद्या बालन...वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 13:49 IST

तुम्हारी सुलुमध्ये  विनोदी भूमिका साकारल्यानंत विद्या बालन एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरू ...

तुम्हारी सुलुमध्ये  विनोदी भूमिका साकारल्यानंत विद्या बालन एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. मिल्खा सिंग, मेरी कॉम, महावीर फोगट या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट आल्यावर आता. काही राजकारण्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. विद्या बालन  दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपचात झळकणार आहे. विद्याच्या काहानी 2च्या शूटिंग दरम्यान अशा चर्चा ऐकायला येत होत्या शेवटी ही गोष्ट कन्फर्म झाली आहे. होय, इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये विद्या बालन इंदिरा गांधी यांची बूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ राय कपूर या चित्रपटाचा निर्माता आहे. पहिल्यांदा विद्या आपल्या पतीसोबत काम करणार आहे. चित्रपटाची कथा सागरिका घोष लिहिते आहे. याची माहिती स्वत: सागरिकाने ट्वीट करुन दिली. सागरिकाने ट्वीट करत लिहिले आहे की, मी माझ्या पुस्तकासाठी रॉय कपूर प्रॉडक्शन आणि विद्या बालनसोबत कॉन्ट्रेक्ट साईन केला आहे. आता मला इंदिरा यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना पाहायची आहे. सागरिका घोष यांचे पुस्तक इंदिरा, इंडियाज मोस्ट पॉवरफुल पीएम या पुस्तकाचे राइट्स सिद्धार्थ रॉय कपूरने खरेदी केले आहेत. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध चालला आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान होत्या. दरम्यान विद्याच्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. बेमग जान फ्लॉप झाल्यानंतर विद्याला एक हिट चित्रपटाची गरज होती. सुलु साकारताना विद्याने कुठलीही आक्रमकता न दाखविता ही भूमिका सहज साकारली होती. प्रेक्षकांना तिची ही भूमिका चांगलीच पसंतीस आली. अतिशय सामान्य कथा असलेल्या या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले.  ALSO  RAED :   ​या कारणामुळे कमनशिबी म्हणून हिणवण्यात आले होते विद्या बालनला विद्याच्या ‘तुम्हारी सुलु’ला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विद्या भलतीच खूश झाली होती.  तिने मुलाखतीदरम्यान सांगितले की, या अगोदर मी जे चित्रपट केले होते ते कदाचित प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत. मात्र ‘तुम्हारी सुलु’चे यश माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्या अभिमानास्पद आहे.