Video Viral : सेल्फीसाठी लोकांनी लावली रांग! रणवीर सिंगने काहींना धक्का देत लोटले दूर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 13:24 IST
चाहते रणवीरसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात आणि रणवीरही अगदी आनंदाने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करतो. पण अलीकडे भलतेच काही झाले.
Video Viral : सेल्फीसाठी लोकांनी लावली रांग! रणवीर सिंगने काहींना धक्का देत लोटले दूर!!
‘पद्मावत’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर रणवीर सिंग ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. अर्थात कितीही बिझी असला तरी रणवीर चाहत्यांना कधीही नाराज करत नाही. कारण रणवीर स्वभावाने अतिशय कूल आहे. चाहते समोर आलेत की, रणवीर अतिशय संयमाने त्यांना सामोरे जातो. चाहते रणवीरसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात आणि रणवीरही अगदी आनंदाने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करतो. पण अलीकडे भलतेच काही झाले. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. होय, हा व्हिडिओ एका जिमबाहेरचा आहे. रणवीर जिमबाहेर उभा आहे आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी अक्षरश: रांग लावली आहे. याच व्हिडिओत रणवीर काही चाहत्यांना धक्का देत दूर लोटतांना दिसतो आहे. सीडीएस इंडिया नामक युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रांगेत अनेक चाहते सेल्फीसाठी ताटकळत उभे असताना काही जण रणवीरसोबत अनेकदा सेल्फी घेताना वा व्हिडिओ काढताना दिसले. हे पाहून रणवीर संतापला आणि त्याने अशांना अगदी धक्का देत बाजूला केले. एकाला तर रणवीर अगदी हात पकडून बाजूला करत असल्याचे या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतेय. ALSO READ : प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार?तूर्तास रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग धडाक्यात सुरु आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो अलीकडे लिक झाले होते. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागली आहे. यात तो पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारणार आहे.