Join us  

आईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:44 PM

राखीने एक व्हिडीओ शेअर करत सलमान खान आणि सोहेल खान या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत.

ठळक मुद्देराखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. राखी बिग बॉस 14 मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते.

 राखी सावंतची (Rakhi Sawant) आई कॅन्सरशी लढतेय. आज राखीच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया होत आहे. या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या आईच्या शरीरातील कॅन्सर ट्यूमर काढण्यात येणार आहे. राखीने एक व्हिडीओ शेअर करत, ही माहिती दिली आहे. शिवाय सलमान खान (Salman Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत. (Rakhi Sawant mother cancer operation)सलमान आणि सोहेल यांच्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन होतेय. त्यांच्यामुळेच माझी आई ठीक आहे. देवाने प्रत्येक घरात सलमान-सोहेल सारखे मुलं जन्माला घालावीत, असे राखीने या व्हिडीओत म्हटले आहे.राखी म्हणते, आज माझ्या आईचे ऑपरेशन आहे. कॅन्सरचा ट्यूमर डॉक्टर काढून टाकतील. मी खूप आनंदात आहेत. आई, आता तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुझ्या शरीरातला कॅन्सर नेहमीसाठी संपणार आहे. मी सलमानला यासाठी धन्यवाद देईल. तूच माझ्या आईचा जीव वाचवला. परमेश्वरामुळे आणि तुझ्यामुळेच आईचे इतके मोठे ऑपरेशन होतेय. तू आम्हाला जगातील सर्वोत्तम डॉक्टर आम्हाला दिलास. मी परमेश्वराला प्रार्थना करते की, भारताच्या प्रत्येक घरात सलमान व सोहेलसारखा मुलगा जन्मास येवो. सलमानच्या कुटुंबाचेही मी आभार मानते़ तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात.

राखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. राखी बिग बॉस 14 मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. आईच्या उपचारासाठी राखीला पैशांची गरज होती. या पैशासाठीच तिने 10 लाख रूपये घेऊन बिग बॉसचा शो सोडला होता. याशिवाय सलमान व सोहल खानने राखीची मदत केली होती. सलमानने राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.

राखी आई झाली भावूक...व्हिडीओत राखीची आई भावूक झालेली दिसतेय. हॉस्पीटलच्या बेडवरून ती बोलतेय. ती म्हणते, ‘पैसे नव्हते़ मी अशीच मरणार का? ही चिंता होती. अशावेळी परमेश्वराने सलमान खानला एंजल बनवून पाठवले. माझ्यासाठी तो उभा झाला. आज त्याच्यामुळे माझे ऑपरेशन होतेय. सलमान तू सदा आनंदी राहशील. तुझ्यावर तुझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते. माझा परमेश्वर तुला सांभाळेल.’

टॅग्स :राखी सावंतसलमान खान