Join us  

VEERAM TRAILER: हृतिक रोशनने केले कुणाल कपूरच्या चित्रटपटाचे ट्रेलर शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 8:09 AM

हृतिक रोशनने त्याचा मित्र कुणाल कपूरचा मल्याळम चित्रपट ‘वीरम’चे पहिले ट्रेलर फेसबुकवर शेअर केले. शेक्सपियरच्या ‘मॅक्बेथ’ नाटकावर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकवरच्या भूमिकेत आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या कलाकारांनी एकमेकांच्या चित्रपटाचे पोस्टर किंवा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे. शाहरुख आणि सलमान खान एक मेकांच्या चित्रपटाचे फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर करीत असतात. आता हृतिक रोशनने त्याचा मित्र कुणाल कपूरच्या मल्याळम चित्रपट ‘वीरम’चे पहिले ट्रेलर फेसबुकवर शेअर केले.शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकवरच्या भूमिकेत आहे. सत्तेच्या लालसेपोटी होणारा त्याचा संघर्ष अत्यंत भव्यदिव्यपद्धतीने दाखवण्यात आला आहे. ‘चेवकर’ हे कुशल योद्धे म्हणून प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळात राजांसाठी लढाई करणारा योद्धा कुणाल कपूर साकारत आहे.                                          तीन भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे. ‘३००’, ‘हंगर गेम्स’, ‘अवतार’ यासारख्या सिनेमांचे स्टंट दिग्दर्शक अ‍ॅलन पॉपल्टन, हॉलीवूड संगीतकार जेफ रोना यांनी पार्श्वसंगीत, अवॉर्ड-विजेते मेक-अप आर्टिस्ट ट्रेफॉर प्राऊड अशा अनेक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांनी या चित्रपटासाठी काम केले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या ९१ गाण्यांमध्ये या चित्रपटातील ‘वुई विल राईज’ या गाण्याचा समावेश होता.येत्या २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे ट्रेलर शेअर केल्याबद्दल कुणाल कपूरने त्याचे ट्विटरवर आभार मानले. त्याने ट्विट केले की, ‘धन्यवाद डुग्गू!’ या प्राचीन कालीन युद्धपटाचे टीझर आल्यापासूनच प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. आता हे पॉवरपॅक्ड अ‍ॅक्शन ट्रेलरमुळे नक्कीच उत्सुकता ताणली जाते. वेशभूषा, ग्रँड सेट, कलरीपयाट्टू या पारंपरिक मार्शल आर्ट प्रकारातील फाईट सीन्स नक्कीच लक्ष वेधण्यात यशस्वी ठरतात.