Join us

वरुण धवनच्या 'अक्टूबर' चित्रपटाचा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 14:39 IST

वरूण धवन आणि बनिता संधूच्या 'अक्टूबर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच सुंदर आहे. ट्रेलरमध्ये वरुण एका नव्या अंदाजात दिसतो आहे.

वरूण धवनचा चित्रपट 'अक्टूबर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात वरूण धवनच्या अपोझिट बनिता संधू झळकणार आहे. या चित्रपटाचे याआधी दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पहिल्या पोस्टरमध्ये वरुण आकाशाकडून बघून विचारात मग्न असल्याचा दिसला होता तर दुसऱ्या पोस्टरमध्ये वरुण आणि बनिता एकत्र बसल्याचे दिसत होते.  13 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच सुंदर आहे. ट्रेलरमध्ये वरुण एका नव्या अंदाजात दिसतो आहे. वरुण धवनने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना वरुणने लिहिले आहे की, ''अखेर तो क्षण आला, ही आहे डैनी आणि शिऊलीच्या प्रेम कथेची एक झलक.''  ट्रेलरमध्ये वरुण आणि बनिता एका हॉटेलमध्ये काम करताना दिसतायेत. ट्रेलरमध्ये अपघातामुळे बनिताला आयसीयूमध्ये दाखल केलेली दाखवण्यात आले आहे त्यानंतर तिचा स्मृतीभ्रंश होतो. अक्टूबर’ या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना  वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत  सरकार  ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल. यानंतर वरूण अनुष्का शर्मासोबत स्क्रिनवर रोमांस करताना दिसणार आहे. सुई धागा या चित्रपटात वरुणच्या अपोझिट अनुष्का दिसणार आहे. ALSO READ :  हॉलिवूड अभिनेत्रीने विचारले, ‘आपण एकत्र चित्रपट केव्हा करणार?’ वरुण धवनने दिले मजेशीर उत्तर!याचित्रपटातून बनिता संधू  एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते.  पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही.