Join us  

बॉलिवूडचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर, बालमैत्रिणीशी करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 10:49 AM

Varun Dhawan and Natasha Dalal's Wedding : हे एक ग्रँड लग्न असणार आहे,जे आठवडाभर चालणार आहे.

सध्या वरुण धवन त्याचा आगामी सिनेमा ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या शुक्रवारी वरुण आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वरुण त्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकाच पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत आहे. वरुणच्या लग्नाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत मे महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहे. हे एक ग्रँड लग्न असणार आहे,जे आठवडाभर चालणार आहे. यात मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनचा समावेश आहे.

रिपोर्टनुसार हे लग्न गोव्यातील बीच रिसोर्टला किंवा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होईल. काही बॉलिवूड सेलिब्रेटींनादेखील त्यांच्या तारख्या रिझर्व्ह करुन ठेवायला सांगण्यात आल्या आहेत. वरुणच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि सलमान खान यासारख्या अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वरुण आणि नताशाच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाची डेट सिक्रेट ठेवली आहे. 

स्ट्रिट डान्सर 3 बाबत बोलायचे झाले तर या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल